Entertainment News Live Updates 14 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Mili Movie New Poster: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) आगामी चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने बघत असतात. तिच्या मिली या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमधील जान्हवीच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. तिच्या 'मिली' या थ्रिलर चित्रपटचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.
Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. नुकतीच मलायकानं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. या फॅशन वीकमध्ये मलायकानं रॅम्प वॉक देखील केला. फॅशन वीकसाठी मलायकानं एक खास लूक केला होता. तिच्या लूकला आणि रॅम्प वॉकला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BFF असणाऱ्या अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि तेजस्विनीमध्ये (tejasvini lonkar) वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. दोघेही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण अनेकदा हे लव्ह बर्ड्स एकत्र फिरताना आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसले आहेत. दोघेही पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत,असं म्हटलं जात आहे. नुकतीच सिद्धार्थनं झलक दिखला जा (Jhalak Dikhhla Jaa) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सिद्धार्थला करण जोहरनं एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धार्थनं हटके रिअॅक्शन दिली.
मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.
कनिका मानने आपल्या अभिनयाची जादू देशभरातील लोकांवर चालवली आहे. ती बहुतेक शोमध्ये सुसंस्कृत सून, पत्नी आणि मुलीच्या भूमिकेत दिसली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री खूपच बोल्ड राहते. स्टंट आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' चा भाग झाल्यानंतरच कनिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
चित्रपटाच्या नावावरून अर्थात ‘कोडनेम तिरंगा’ यावरूनच कळतं की, हा चित्रपट देशासाठी गुप्त मिशनवर जाणाऱ्या एखाद्या रॉ एजंटची कथा सांगणारा असणार आहे. मात्र, कथेत ट्वीस्ट असा आहे की, यावेळी गुप्तहेर एखादा पुरुष नाही तर, स्त्री असणार आहे. हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. चित्रपट पाहताना सतत कथा जुनीच असल्याचं लक्षात येतं. कलाकारांचा अभिनय चांगला असला तरी कथेत काही नाविन्य नाही. चित्रपटाची कथा ही रटाळवाणी वाटते. जाणून घेऊया कथानक..
या आठवड्यात सलमान खान शालीनची चांगलीच कानउघडणी करणार आहे. तर, अर्चना गौतम आणि अब्दू रोजिक यांचं तो कौतुक करणार आहे. त्याचबरोबर या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनचीही माहितीही यावेळी मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे ते सतत चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर होते. प्रकरण इतके बिघडले की, गोष्टी घटस्फोटापर्यंत देखील गेल्या होत्या. पण, गेल्या महिन्यात घटस्फोटाच्या आधीच त्यांनी मुलगी जियानासाठी आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक सुरु होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आयुष्मान नेहमीच हटके विषयांवरील भूमिका निवडतो. ‘विकी डोनर’, ‘बाला’नंतर पुन्हा एकदा आयुष्मान एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज (14 ऑक्टोबर) त्याचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याने नेहमीच प्रेक्षकांना मनोरंजनात नाविन्य देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्याच्या या चित्रपटाकडून देखील चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Jhalak Dikhhla Jaa 10: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. दोघेही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण अनेकदा हे लव्ह बर्ड्स एकत्र फिरताना आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसले आहेत. दोघेही पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत,असं म्हटलं जात आहे. नुकतीच सिद्धार्थनं झलक दिखला जा (Jhalak Dikhhla Jaa) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सिद्धार्थला करण जोहरनं एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धार्थनं हटके रिअॅक्शन दिली.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वकानी 2017मध्ये मॅटर्निटी लीव्हवर गेली होती. त्यानंतर दिशा अद्याप शोमध्ये परतलेली नाही. अनेकवेळा तिच्या परतीच्या बातम्या आल्या, पण दिशा पुन्हा मालिकेत आलीच नाही. आता अभिनेत्रीच्या तब्येतीच्या अफवा उठल्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे दिग्दर्शक मालव राजदा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अशा बातम्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि गायक हार्डी संधू (Harrdy Sandhu) यांचा चित्रपट ‘कोडनेम तिरंगा’ (Code Name Tiranga) हा आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांच्यासोबत शरद केळकर, रजत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
कोरियन पॉप बँड ‘BTS’चे चाहते केवळ कोरियातच नाहीत तर, जगभरात पसरलेले आहेत. या म्युझिक बँडच्या टीमने चाहत्यांना अक्षरशः आपलं वेड लावलं आहे. तर, चाहते देखील बीटीएस हे नाव ऐकताच उत्साहित होतात. नुकताच ‘केबीसी 14’च्या (KBC 14) मंचावर महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘BTS’बद्दल एक प्रश्न विचारला, जो ऐकून चाहते देखील आनंदित झाले.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
साजिद खानमुळे ‘बिग बॉस 16’ वादात! अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून सलमान खान आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस
नेहमीप्रमाणेच यंदाचा ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) वादात अडकला आहे. निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याला स्पर्धक म्हणून घरात घेतल्याने या शोवर प्रचंड होत आहे. अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींवर लैंगिक शोषण केल्याचा अर्थात MeToo आरोप झाल्यानंतरही चित्रपट निर्माता साजिद खानला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून कास्ट केल्याबद्दल आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) कलर्स चॅनल आणि सलमान खानवर (Salman Khan) संतापली आहे. शर्लिन चोप्राकडून या शोच्या मेकर्सना आणि सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
दयाबेनला कॅन्सरची लागण? सुंदर अन् जेठालालनं दिली प्रतिक्रिया
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी (Disha Vakani) . दिशा यांनी काही वर्षांपूर्वी हा शो सोडला. सध्या दिशा या चर्चेत आहेत. दिशा यांना कॅन्सरची लागण झाली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. आता मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि सुंदर ही भूमिका साकारणारा मयूर वकानी यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्पाल लांजेकरांनी चित्रपटाचा विषय बदलला? 'सुभेदार' च्या घोषणेनंतर चाहत्यांचा प्रश्न
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या शेर शिवराज, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच दिग्पाल यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'सुभेदार' (Subhedar) असं आहे. दिग्पाल यांनी सोशल मीडियावर सुभेदार या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले. पण दिग्पाल यांच्या या चित्रपटाचं पोस्टर पाहून अनेक नेटकऱ्यांना सध्या काही प्रश्न पडत आहेत.
'आधी इराणमध्ये आणि आता भारतात...'; उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत
उर्वशीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती दु:खी दिसत आहे. व्हिडीओला उर्वशीनं कॅप्शन दिलं, 'आधी इराणमध्ये माहसा अमिनी आणि आता भारतामध्ये.... माझ्यासोबत असंच होत आहे. ते मला स्टॅकर म्हणून चिडवत आहेत? कोणीही माझी काळजी घेत नाही किंवा मला पाठिंबा देत नाही. एक स्ट्रँग स्त्री ती असते जी प्रेम करते. ती हसते तसेच तिच्या डोळ्यांमधून अश्रू देखील येतात. ती स्वभावाने शांत आणि शक्तिशाली दोन्ही आहे, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही आहे. स्त्री ही जगाला मिळालेली एक भेट आहे.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -