Entertainment News Live Updates 14 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Apr 2023 05:51 PM
Harry Potter: 'हॅरी पॉटर' आता ओटीटीवर; घरबसल्या पाहता येणार जादूई दुनिया, केव्हा होणार रिलीज? जाणून घ्या

Harry Potterहॅरी पॉटरचे (Harry Potter) चाहते जगभरात आहेत.  हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती.  या कथांनी सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकली. लोक जेव्हा या कथा पाहतात तेव्हा त्यात हरवून जातात. आजही हॅरी पॉटर या चित्रपटांची सीरिज लोक आवडीनं बघतात.  आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी एचबीओ मॅक्स (HBO Max) या ओटीटी प्लॅटफॉर्मनं दिली आहे. एचबीओ मॅक्सनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हॅरी पॉटरच्या टेलिव्हिजन सीरिजची माहिती दिली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून हॅरी पॉटरचे चाहते खूश झाले आहेत. 



Jogira Sara Ra Ra Teaser Out: 'जोगी का जुगाड कभी फेल नहीं होता' ; नवाजुद्दीनच्या ‘जोगीरा सारा रा रा’ चा टीझर रिलीज

Jogira Sara Ra Ra Teaser Out : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.अशातच नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नवाजुद्दीनचा ‘जोगीरा सारा रा रा’ (Jogira Sara Ra Ra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनचा कॉमेडी अंदाज बघायला मिळत आहे.



Satish Kaushik Birthday Celebration : सतीश कौशिक यांचा वाढदिवस अनुपम खेर यांनी धुमधडाक्यात साजरा केला

Satish Kaushik Birthday Celebration : दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूडमधील त्यांच्या खास मित्रांनी मुंबईत एका पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीदरम्यान बॉलिवूडकरांनी सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Abhijit Bichukale : बिचुकले 'भाईजान'ला पाहून नेटकरी बिचकले; म्हणाले"आम्ही याचा निषेध करतो..."

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Poster Abhijit Bichukale : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे पोस्टर आऊट झाल्यानंतर एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर पसरली जादुई हवा; 'या' जादूगारांची जादू पाहून आश्चर्यचकित व्हाल!

Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावरील  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नुकतीच काही जादूगारांनी या शोमध्ये हजेरी लवाली.  अक्षय लक्ष्मण (Akshay Laxman), मधुगंधा इंद्रजीत (Madhugandha Indrajeet), केदार परुळेकर (Kedar Parulekar), जितेंद्र रघुवीर (Jitendra Raghuvir) यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली. या जादूगारांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये काही जादूचे प्रयोग सादर केले. 



Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराला झाला तिच्या आईला पाहिल्याचा भास; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि स्वरा यांच्या आयुष्यात लवकरच मंजुळाची एन्ट्री होणार आहे, असं म्हटलं जात आहे. स्वराची आई वैदेहीचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. आता मालिकेच्या प्रोमोमध्ये स्वराला तिच्या आईचा भास झाला आहे, असं दिसत आहे. 





Ved On OTT: रितेश- जिनिलियाचा 'वेड' आता ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? जाणून घ्या

Ved On OTT:  डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघताना येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी  डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्रामवरील पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचं वेड आम्हाला पण लागलं आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीम केला जाणार आहे.'



Rang Maza Vegla : "बंद करा ही मालिका"; आयेशाची एन्ट्री प्रेक्षकांना खटकली

Rang Maza Vegla Latest Update : रंग माझा वेगळी (Rang Maza Vegla) ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मालिकेचं कथानक 14 वर्ष पुढे गेल्याने अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मालिकेचा हिरो कार्तिक आता खलनायकाच्या भूमिकेत आहे. दरम्यान मालिकेत आता आयेशाची एन्ट्री झाली असून तिच्या एन्ट्रीने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. त्यामुळे आता मालिकेवरदेखील टीका होत आहे.





Asha Bhosle Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांना गाण्याचा सराव करण्याचा आशा भोसलेंचा सल्ला

Asha Bhosle Amruta Fadnavis : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांना नुकताच राज्य सरकारच्या सर्वोच्च असलेल्या 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतीच आशा भोसले (Asha Bhosle) यांची भेट घेतली आहे. 





Sherlyn Chopra : शर्लिन चोप्राला जीवे मारण्याची धमकी; अभिनेत्रीने आरोपीविरोधात दाखल केला गुन्हा

Sherlyn Chopra : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सध्या चर्चेत आहे. शर्लिनने एका फायनान्सरविरोधात मुंबईच्या जुहू पोलीस (Juhu Police Station Mumbai) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'हे' सिनेमे नक्की पाहा

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती आहे. त्यांची जयंती (Ambedkar Jayanti 2023) आज देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'भीम गर्जना', 'डॉ. आंबेडकर', 'बोले इंडिया जय भीम' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. आज 'भीम जयंती'निमित्त त्यांच्यांशी संबंधित असलेल्या सिनेमांबद्दल जाणून घ्या...


Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'हे' सिनेमे नक्की पाहा; जाणून घ्या त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या कलाकृतींबद्दल...

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shah Rukh Khan : आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पुन्हा झळकण्यासाठी शाहरुख खान सज्ज


Shah Rukh Khan Dunki Movie Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्याचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 'डंकी' या सिनेमात किंग खान आर्मी ऑफिरच्या भूमिकेत दिसणार आहे.


Shahid Kapoor : नाकावर जखम, डोळ्यात आग; शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी'चं पोस्टर आऊट


Shahid Kapoor Bloody Daddy First Look Poster Out : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' (Bloody Daddy) या सिनेमाचं पोस्टर आता आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. शाहिद कपूरने सोशल मीडियावर 'ब्लडी डॅडी' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूर खूपच रागात दिसत आहे. नाकावर जखम, डोळ्यात आग आणि शर्टावर रक्ताचे डाग असा काहीसा शाहिदचा लूक आहे. पोस्टर शेअर करत शाहिदने लिहिलं आहे,"ब्लडी डॅडी'चा टीझर लवकरच आऊट होईल".


Appi Aamchi Collector : मेहेनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली! 16 एप्रिलला रंगणार एक तासाचा विशेष भाग


Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका सुरू झाल्यापासून अप्पी कधी कलेक्टर होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर आता तो दिवस जवळ आला आहे. मालिकेच्या आगामी भागात अप्पी कलेक्टर झालेली दिसणार आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या 11 आणि 12 एप्रिलच्या भागात अप्पीची मुलाखत वकील उज्वल निकम आणि आयएएस ऑफिसर विश्वास पाटील घेताना दिसून आले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.