Entertainment News Live Updates 13 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Jitendra Awhad : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा माझा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Goshta Eka Paithanichi : '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) पुरस्कार सोहळ्यात बाजी मारलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाचा आज सिंगापूरमध्ये प्रिमीअर शो पार पडला आहे.
Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती म्हणाले,"मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा एक वेळचं जेवण आणि कुठे झोपावं अशा गोष्टींचा विचार करावा लागत असे. कधी-कधी मी फूटपाथवरच झोपलो आहे. माझ्या आयुष्याची कथा, माझा संघर्ष कोणालाही प्रेरणा देणारा नाही. उलट मानसिकदृष्ट्या त्रास होईल. त्यामुळेच माझ्या आयुष्यावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही.
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या घरातून नृत्यांगना गोरी नागोरी (Gori Nagori) बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर गोरीने शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतमवर (Archana Gautam) निशाणा साधला आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांची कारकीर्द घडवण्यात बऱ्याच दिग्दर्शकांचा हात आहे. रमेश सिप्पी, ऋषिकेश मुखर्जी, राकेश मेहरा, कादर खान. अशाच काही नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे राकेश कुमार. १०नोव्हेंबर रोजी याच दिग्दर्शकाने अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील काही उत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. राकेश कुमार यांचं निधन कर्करोगामुळे झालं असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Akshay Kumar On Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन दिसणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. दुसरीकडे कथानक न आवडल्याने अक्षय कुमारने या सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खिलाडी कुमारचे चाहते नाराज झाले आहेत.
Amey Wagh : मराठी मनोरंजनसृष्टीतील वाघाचा अर्थात अमेय वाघचा आज वाढदिवस आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’, अमर फोटो स्टुडिओ’ अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून अमेयने आपल्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ पाडली आहे. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट आहे.
Manasi Naik : मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. पण आता मानसी आणि प्रदीपमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं चित्र आहे. तसेच मानसी लवकरच पतीपासून विभक्त होणार असल्याचीदेखील चर्चा आहे. कारण मानसीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे प्रदीपसोबतचे फोटो डिलीट केले आहेत.
Juhi Chawla : जुही चावला (Juhi Chawla) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 80-90 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत जुहीचा चांगलाच दबदबा होता. 1988 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातील जुहीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. तसेच ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ यांसारख्या अनेक सिनेमांत जुहीने काम केलं आहे. आज जुही 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Happy Birthday Juhi Chawla : 'राजा हिन्दुस्तानी' ते 'दिल तो पागल है'; सुपरहिट सिनेमे नाकारलेली मिस इंडिया; जाणून घ्या सुपरस्टार जुही चावलाच्या खास गोष्टी...
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bipasha Basu : आलिया-रणबीर पाठोपाठ बिपाशा-करणला कन्यारत्न
आलिया-रणबीरनंतर लगेचच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवरने (Karan Singh Grover) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा-करणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. बिपाशाने खार येथील हिंदुजा रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला आहे.
कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंड
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. याची किंमत 18 लाख आहे. त्यामुळे शाहरुखला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. दुबईहून येत असताना कस्टम विभागाने शाहरुखला रोखलं. तब्बल एक तास शाहरुखची चौकशी सुरू होती. किंग खानच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली आहे. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर छोटे हास्यवीरांची धमाल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात वेगळेपण येणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त छोटे हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यातल्या सर्वोत्तम स्पर्धकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मंचावर आमंत्रित केले गेले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर हे हास्यवीर धमाल करताना दिसणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -