Virendra Sehwag : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चिल्या जात आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कुटुंबातील जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दोघे अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि घटस्फोटाची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये लग्न केलं असून त्यांना दोन मुले आहेत. आर्यवीरचा जन्म 2007 आणि वेदांतचा 2010 मध्ये झाला. पाकिस्तानमध्ये 2004 च्या दौऱ्यामध्ये मुलतान कसोटीत त्रिशतक ठोकल्यानंतर सेहवाग काही महिन्यांमध्ये लग्नाच्या बेडीत अडकला होता. त्यामुळे सेहवागची ओळख आजही मुलतानचा सुलतान म्हणून केली जाते.
सेहवागने पत्नीचा नाही तर कुटुंबाचा फोटो पोस्ट केला
दोन आठवड्यांपूर्वी वीरेंद्र सेहवागने पलक्कड येथील विश्व नागयाक्षी मंदिराला भेट दिली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्याच्यामध्ये आरती कुठेच दिसत नव्हती. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दिवाळी 2024 ला त्याच्या कुटुंबाचा शेवटचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्या फोटोंमध्ये सेहवाग व्यतिरिक्त त्याचा मुलगा आणि आई दिसली, पण पत्नी आरती अहलावत दिसली नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की या जोडप्याची दीर्घकाळापासून असलेली नात्यातील वीण आता तुटण्याच्या मार्गावर आहे.
जेटलींच्या निवासस्थानी सेहवागच्या लग्नाच्या धुमधडाका
जेटली 2004 मध्ये कायदा मंत्री होते आणि दिल्लीतील 9 अशोका रोड हे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. 2004 मध्ये वीरेंद्र सेहवागच्या लग्नासाठी जेटलींनी त्यांचे अधिकृत निवासस्थान दिले होते. सेहवागने 22 एप्रिल 2004 रोजी आरतीशी लग्न केले. वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचा विवाह 22 एप्रिल 2004 रोजी 9 अशोका रोड, दिल्ली येथे झाला. हे जेटली यांचे अधिकृत निवासस्थान असल्याने लग्नस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि एकाही मीडिया व्यक्तीला प्रवेश दिला गेला नाही. एवढेच नाही तर गेटवरच ओळखपत्र दाखवून पाहुण्यांना प्रवेश मिळत होता.
आरती बालपणीची मैत्रीण होती
वीरेंद्र सेहवागने 22 एप्रिल 2004 रोजी बालपणीची मैत्रीण आरती अहलावतशी लग्न केले. सेहवाग पहिल्यांदा आरतीला भेटला तो अवघ्या 7 वर्षांचा होता, तर आरती 5 वर्षांची होती. 17 वर्षांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होण्यासाठी 14 वर्षे लागली. वीरेंद्र सेहवागने एकदा सांगितले होते की, मे 2002 मध्ये त्याने विनोदी स्वरात आरतीला प्रपोज केले होते. त्याचवेळी आरतीने खरा प्रस्ताव मानला आणि लगेच हो म्हणाली. दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले. दोघांनी 2004 मध्ये लग्न केले.
कोण आहे आरती अहलावत?
16 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेल्या आरतीने लेडी इर्विन माध्यमिक विद्यालय आणि भारतीय विद्या भवनमधून शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मैत्रेयी कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या