Entertainment News Live Updates 13 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2022 09:34 PM
पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठकचा बोलबाला

विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील चपखलपणे साकारणारे चतुरस्त्र अभिनेते संदीप पाठक यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे. सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलच गाजत आहे. 

बंगळुरुमधील ड्रग्स पार्टीमध्ये मित्रांसोबत दिसला सिद्धांत कपूर

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला (Siddanth Kapoor) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत असून त्याने ड्रग्सचे सेवन केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ड्रग्स पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धांत मित्रांसोबत फिरताना दिसत आहे. 

Nikhil Bane : हास्यजत्रा फेम निखिल बनेने चाळीतील घराचा व्हिडीओ केला शेअर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. निखिलने चाळीतील घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने निखिलला ओळख मिळवून दिली आहे. निखिल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून आजही तो चाळीत राहतो. निखिलने नुकताच चाळीतील घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 





Major : प्रेक्षकांची पसंती 'मेजर'ला

'मेजर' सिनेमाने आतापर्यंत 7.63 कोटींची कमाई केली आहे. 





सलमान, सलीम खान यांना धमकीचे पत्र देणाऱ्यांचा मुंबई पोलिसांना शोध लागणार?

Salman Khan : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

'तुम्हा रसिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत!'; झी-मराठीची पोस्ट चर्चेत

Zee Marathi : झी-मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील नेहा आणि यशच्या  लग्न सोहळ्याचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या भागामध्ये काही झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे आता झी-मराठीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या मालिकेच्या विशेष भाग पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.  


वाचा सविस्तर बातमी 

भूल भुलैय्या-2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

भूल भुलैय्या-2  या चित्रपटानं 171.17 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 





Zee Marathi : 'तुम्हा रसिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत!'; झी-मराठीची पोस्ट चर्चेत

Zee Marathi : झी-मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील नेहा आणि यशच्या  लग्न सोहळ्याचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या भागामध्ये काही झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे आता झी-मराठीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या मालिकेच्या विशेष भाग पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.  


वाचा सविस्तर 

‘हसता हा सवता’ 17 जून रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Hasata Ha Savata : नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने  आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ 17 जूनला दु. 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदान्त एन्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.


वाचा सविस्तर बातमी 

जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू

Vikram box office day 10 collection : अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांचा विक्रम (Vikram) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर  300 कोटींची कमाई केली आहे. 

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट आता ओटीटीवर होणार रिलीज

Samrat Prithviraj On OTT :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट  3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी होतं. पण चित्रपटानं मात्र जवळपास 65 कोटींची कमाई केली. आता बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या हा चित्रपट ओटीटी रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

टायगर श्रॉफनं दिशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला, 'हॅप्पी बर्थडे अॅक्शन हीरो'

टायगर श्रॉफनं दिशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिशासोबतचा फोटो शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं,  'हॅप्पी बर्थडे अॅक्शन हीरो'


 टायगरची पोस्ट :


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्सचं सेवन केल्याचं निष्पन्न


Siddhant Kapoor : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर (shakti kapoor) यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'सिद्धांत कपूरसह  सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचं निष्पन्न झालं', अशी माहिती एका वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत उपस्थित होता. 5 स्टार हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतलं आहे.


R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल


R Madhavan : बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता  आर माधवनचा (R Madhavan) ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ (Rocketry) हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण (Nambir Narayan) यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून तो या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकला. 


वाचा सविस्तर बातमी 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.