Entertainment News Live Updates 13 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Dec 2022 04:15 PM
Pitchers-2 चा ट्रेलर प्रदर्शित; नवीन कस्तुरिया अन् अभिषेक बॅनर्जी प्रमुख भूमिकेत

Pitchers S2 Trailer: ओटीटीवरील विविध विषयांवर आधारित वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही वेब सीरिजच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. नुकत्याच एका वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाली. या सीरिजचं नाव पिचर्स(Pitchers) असं आहे. पिचर्स (Pitchers-2) सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 


Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 





Urmila Kothare : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान उर्मिला कोठारेची पोस्ट चर्चेत

Urmila Kothare : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 





लव्ह रंजनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; TJMM चा फुल फॉर्म काय? चाहते कोड्यात

TJMM:  दिग्दर्शक लव्ह रंजन हा त्याच्या कॉमेडी आणि लव्ह स्टोरीवर आधारित चित्रटांमुळे ओळखा जातो. लवकरच त्याचा TJMM हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लव्ह रंजननं सोशल मीडियावर शेअर केलं. 





Ved Trailer Out : 'वेड' तुझ्यातही आहे आणि माझ्यातही; रितेश-जेनिलियाच्या 'Ved'चा ट्रेलर आऊट

Riteish Genelia Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरमध्ये रितेश आणि जेनिलियाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना श्रावणी आणि सत्याच्या अनोख्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. 


SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौलींनी उलगडलं यशाचं गुपित

SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौली (SS Rajamouli) सध्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' (RRR) या सिनेमामुळे जगभरात चर्चेत आहेत. नुकतचं या सिनेमाला मानाच्या 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी नामांकन (Golen Globes 2023 Nomination) मिळालं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात या सिनेमाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत एसएस राजामौलींनी त्यांच्या यशाचं गुपित सांगितलं आहे. 


SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौलींनी उलगडलं यशाचं गुपित; म्हणाले,"प्रेक्षकांना काय आवडतं"

Trupti Khamkar: 'गोविंदा नाम मेरा'नंतर मी कामवालीची भूमिका साकारणार नाही : तृप्ती खामकर

Trupti Khamkar: अभिनेत्री तृप्ती खामकरनं आता मुख्य भूमिकेशिवाय कामवालीची भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'मला ही भूमिका मिळाली कारण आपल्या इंडस्ट्रीत टाइपकास्टिंग खूप आहे. कामवालीच्या भूमिकेसाठी मला मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमधून फोन आला. मी म्हणाले नाही, मला कंटाळा आला आहे कारण मला लोकांनी कामवाली बाई म्हणून जवळपास सगळीकडे पाहिले जाते. पण ते म्हणाले की ही भूमिका वेगळी आहे कारण प्रत्येक पात्राची कथा वेगळी आहे. आता मी धर्मा प्रॉडक्शन्ससाठी बाईची भूमिका साकारल्यानंतर मी कोणासाठी बाई म्हणून काम करणार नाही. जर मुख्य भूमिका असेल तर मला द्या.' असंही तृप्तीनं मुलाखतीमध्ये सांगितलं. 





Dipali Sayyed : अभिनेत्री दीपाली सय्यदचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

Dipali Sayyed On Sant Maro Sevalal : 'संत मारो सेवालाल' (Sant Maro Sevalal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री दीपाली सय्यद (Dipali Sayyed) सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. राजभवनात (Raj Bhavan) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. 

Dr Vilas Ujawane : 'वादळवाट' फेम हरहुन्नरी अभिनेत्याची ब्रेन स्ट्रोकशी झुंझ

Dr. Vilas Ujawane : 'वादळवाट' (Vadalvaat) फेम अभिनेते, डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) गेल्या सहा वर्षांपासून ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराचा सामना करताना त्यांचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. ते यातून बाहेर पडावे यासाठी सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आर्थिक मदतीचं आवाहन करत आहेत. 


Athiya Shetty KL Rahul Wedding : लगीनघाईला सुरुवात! केएल राहुल, अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul Wedding Date : सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 





ITA पुरस्कार सोहळ्यात 'The Kashmir Files'चा डंका!

The Kashmir Files Wins ITA Awards 2022 : विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार' (ITA Awards 2022) सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. 





Smita Patil: तिच्याविना आजही मैफिल सुनी सुनी... स्मिताचं गारुड आजही कायम का?

मुंबई: काही लोक आपल्या व्यक्तीमत्वाची अशी छाप सोडून जातात की त्यांना विसरावं म्हटलं तरी विसरणं शक्य नसतं. स्मिता पाटील हे नाव त्यापैकीच एक. अभिनयाची अनभिषक्त सम्राज्ञी, कोट्यवधी मनांवर अधिराज्य करणारी स्मिता पाटीलचं आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी निधन झालं. वयाच्या केवळ 31 व्या वर्षी स्मिताला आजारपणामुळे हे जग सोडावं लागलं आणि अवघी सिनेसृष्टी हळहळली. स्मिताविना आजही मैफिल सुनी सुनी अशीच आहे.


Smita Patil: तिच्याविना आजही मैफिल सुनी सुनी... स्मिताचं गारुड आजही कायम का?

Urfi Javed : उर्फी जावेदच्या अडचणीत पुन्हा वाढ

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाइलने ती चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे. फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) अश्लीलता पसरवबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.   





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Golden Globes 2023: RRR चित्रपटाचा जगात डंका


मुंबई: केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. आरआरआर चित्रपटाचं मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट ओरिजनल साँग या दोन प्रकारात आरआरआर चित्रपटाचे नामांकन झालं आहे. हे नामांकन नॉन इंग्लिश चित्रपटाच्या प्रकारात झालं असून आरआरआर या चित्रपटासोबत इतर चार  चित्रपट या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.  


Nora Fatehi Files Defamation: जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात नोरा फतेहीने दाखल केला मानहानीचा दावा


Nora Fatehi Files Defamation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोराने तिच्या याचिकेत जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 


Bamboo: ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर रिलीज


Bamboo: खरंतर प्रेमात पडलेल्यानंतर आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा आनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रत्येकानेच घेतला असेल. तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे.  ‘बांबू’ (Bamboo) चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.