Entertainment News Live Updates 11 october : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Oct 2022 06:17 PM
Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती' चं सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बी किती घेतात मानधन? जाणून घ्या...

Kaun Banega Crorepati 14: बॉलिवूडचे महानायक म्हणजेच  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटांबरोबरच अमिताभ हे छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati)  या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाचा सद्या 14 वा सीझन सुरु आहे. केबीसीच्या 14 व्या सीझनसाठी अमिताभ बच्चन हे किती रुपये मानधन घेतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जाणून घेऊयात त्यांच्या मानधनाबाबत...  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Doctor G: 'डॉक्टर जी' चित्रपटाचं डॉक्टर्ससाठी स्पेशल स्क्रीनिंग; आयुष्मान खुरानानं लावली हजेरी





Doctor G:  अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), रकुल प्रीत सिंह (rakul preet singh) आणि शेफाली शाह अभिनित जंगली पिक्चर्सचा बहुप्रतिक्षित चित्रपट, 'डॉक्टर जी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गमतीशीर आणि अनोख्या पोस्टर्सपासून ते मनोरंजक ट्रेलरपर्यंत, या चित्रपटाने दर्शकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.


 








छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेवर आधारित 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या चित्रपटातील काही दमदार गाणी आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. तर, चित्रपटाची एक छोटीशी झलक देखील प्रेक्षकांनी पहिली होती. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ‘स्वराज्यात सामील व्हा, नाहीतर मरा..’, अशा जबरदस्त संवादासह चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते.


 





Bigg Boss 16 : घराच्या नियमांचे उल्लंघन, ‘बिग बॉस’ने निमरितकडून हिसकावले कॅप्टनपद!

मात्र, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अर्चना आणि शालीन यांच्यात जेवणावरून झालेल्या वादापासून ते निमरितकडून कर्णधारपद हिसकावण्यापर्यंत असे अनेक जोरदार धमाके पाहायला मिळाले.


 





Ram Setu Trailer: प्रतीक्षा संपली! खिलाडी अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चा ट्रेलर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'

Ram Setu Trailer:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. त्यानंतर नेटकरी या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता 'राम सेतू' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या  ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; प्रोमो पाहिलात?

Bigg Boss Marathi 4:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात. वीकेंडला होणाऱ्या चावडीमध्ये महेश हे स्पर्धांसोबत चर्चा करतात. आता नुकताच या कार्यक्रमाच्या आजच्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धक एकमेकांसोबत भांडत आहेत. 



Myra Vaikul : चिमुकल्या परीची शॉर्टफिल्ममध्ये एन्ट्री! चाहत्यांना म्हणतेय, ‘मी जर मोबाईल असते तर...’

Myra Vaikul : विविध व्हिडीओच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ (Myra Vaikul) आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे.


 


Vivek Agnihotri : ‘आता म्हणाल की हिंदू ट्रोल करतात...’; कियारा अडवाणी-आमिर खानच्या नव्या जाहिरातीवर संतापले विवेक अग्निहोत्री!

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक मुद्द्यांवर बेधडकपणे आपले मत मांडण्यासाठी ते ओळखले जातात. आता 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच आमिर खानच्या (Aamir Khan) नवीन जाहिरातीवर सडकून टीका केली आहे. ‘सामाजिक परंपरा बदलण्याच्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत’, असे म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करून निर्मात्यांना फटकारले आहे.


 





Dhanush And Aishwaryaa Divorce : धनुष आणि ऐश्वर्याचे पॅचअप? अभिनेत्याचे वडील म्हणतात..

Dhanush:  साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth) या दोघांनी आपला 18 वर्षाचा संसार मोडून एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, हे दोघे पॅचअप करणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धनुष आणि ऐश्वर्या यांच्या पॅचअपबाबत धनुषचे वडील कस्तूरी राजा यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्वाला कस्तूरी राजा यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rahul Koli: 'छेल्लो शो' चित्रपटातील बालकलाकारचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Chhello Show Child Actor Died:  यंदाच्या ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून पाठवण्यात आलेला 'छेल्लो शो' (Chhello Show) या चित्रपटातील  बालकलाकार राहुल कोलीचं (Rahul Koli) निधन झालं आहे. राहुल हा कॅन्सरग्रस्त होता. 'छेल्लो शो' (Chhello Show) चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या एकूण 6 बालकलाकारांपैकी राहुल हा एक होता. त्यानं वयाच्या 15 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

PHOTO : रश्मिका मंदनाचा मस्तमौला अंदाज, मालदीवमध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद!

'पुष्पा'ची ‘श्रीवल्ली’ अर्थात रश्मिका मंदना इन्स्टाग्रामवर तिचे व्हेकेशन फोटो शेअर करत आहे. फोटोंमध्ये रश्मिका तिच्या मालदीव व्हेकेशनचा खूप आनंद घेताना दिसत आहे. स्विमसूटमधील लेटेस्ट फोटो शेअर करताना रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'वॉटर बेबी'. रश्मिकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.


 





पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देशातील सर्वात उल्लेखनीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे म्हणत पंतप्रधानांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘अमिताभ बच्चनजी यांना 80व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते भारतातील सर्वात उल्लेखनीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे मनोरंजन केले. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.’


 





नयनतारा अन् विग्नेश लग्नाच्या चार महिन्यांतच पालक कसे झाले? तामिळनाडू सरकार सरोगेसीची चौकशी करणार

या स्टार जोडप्याला लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच मुले झाल्याबद्दल सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावरील या वादानंतर नयनतारा आणि विग्नेश सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. तामिळनाडू सरकारने या जोडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी


 





‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचा जल्लोष, चाहत्यांची ‘जलसा’ बाहेर गर्दी!

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा आज 80वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्यांचे चाहते देखील जल्लोष करताना दिसले आहेत. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवस (Amitabh Bachchan Birthday) निमित्ताने मध्यरात्री बाराच्या सुमारास अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या ‘जलसा’ निवासस्थाना बाहेर मोठ्या संख्येमध्ये चाहत्यांची गर्दी जमली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


करण जोहरचा ट्विटरला अलविदा; नेटकरी म्हणाले, 'भारतामध्ये सुख, शांती...'


बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि कॉफी विथ करण या कार्यक्रमामुळे चर्चेत असतो. नुकतच एक ट्वीट करणनं शेअर केलं. या ट्वीटमधून त्यानं सांगितलं की, तो ट्विटर अकऊंट बंद करत आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. करणनं हे ट्वीट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. 'पॉझिटिव्हग एनर्जी मिळवण्यासाठी आयुष्यात जागा निर्माण करत आहे.त्यासाठी हे पहिलं पाऊल उचललं आहे. गुडबाय ट्विटर', असं ट्वीट शेअर करुन करणनं ट्विटर अकऊंट बंद केलं. त्याचं हे ट्वीट पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.


दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भावनिक ट्वीट


अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांचा जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जीजी गंधाडा गुडी  (GG Gandhada Gudi) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पुनीत यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार (Ashwini Puneeth Rajkumar) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट शेअर केलं.


कतरिना, सिद्धांत आणि ईशान यांच्या 'फोन भूत' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) , अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan khatter) अभिनीत 'फोन भूत'च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'फोन भूत' (PhoneBhoot) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज 'फोन भूत'चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.


विक्रम वेधा’ने पार केला 100 कोटींचा टप्पा! बॉक्स ऑफिसवर दिसली ह्रतिक-सैफच्या जोडीची जादू!


बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.