Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डी साई दरबारी गर्दी केली होती. राज्यातील अनेक तीर्थस्थळी दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली, यावेळी मंदिरात भरभरुन दानही दिलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाताळच्या सुट्ट्या व नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान भाविकांकडून साईंच्याचरणी कोटींचे दान अर्पण करण्यात आलं आहे. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 9 दिवसात भाविकांकडून एकूण 16 कोटी 61 लाख 80 हजार रकमेचे दान करण्यात आलं आहे.
शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. नाताळाच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखांहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहेत.
देणगी काऊंटर वरुन 03 कोटी 22 लाख 27 हजार 508 रुपये प्राप्त, तर पीआरओ सशुल्क देणगी पासेसचे 01 कोटी 96 लाख 44 हजार 200 रुपये
दक्षिणा पेटीतून 06 कोटी 12 लाख 91हजार 875 रुपयांचे दान साईचरणी अर्पण झालं आहे
डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डर - 04 कोटी 65 लाख 73 हजार 698
सोने 809.220 ग्रॅम - 54 लाख 49 हजार 686 रुपये, तर चांदी - 14398.300 ग्रॅम - 09 लाख, 93 हजार 815 रुपये