Entertainment News Live Updates 11 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Mar 2023 05:10 PM
Sushmita Sen : हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्यांदाच दिसली सुष्मिता सेन

Sushmita Sen On Lakme Fashion Week : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुष्मिताला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली आहे. मुंबईत होत असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) सुष्मिता सहभागी झाली होती. 





Ghar Banduk Biryani : 'आशेच्या भांगेची नशा भारी... 'घर, बंदूक, बिरयानी'मधल्या गाण्याला मोहित चौहानच्या आवाजाचा तडका

Ghar Banduk Biryani : 'घर, बंदूक, बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील 'गुन गुन' आणि 'आहा हेरो' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता लवकरच या सिनेमाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित होणार आहे. 'आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मोहित चौहानने (Mohit Chauhan) गायलं आहे. 





TJMM : बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'ची गाडी सुसाट; जाणून घ्या तिसऱ्या दिवसांचं कलेक्शन...

Tu Jhoothi Main Makkaar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 8 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 





Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या आयुष्यात पुन्हा 'तो' क्षण आला

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत अरुंधती दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. अरुंधतीचं दुसरं लग्न तिच्या मुलांनी आणि सासू सासऱ्यांनी धुमधडाक्यात लावून दिलं आहे. मालिकेत सर्व सकंटांवर मात करत अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात अरुंधतीची पाठवणी होताना दिसणार आहे. 



Shah Rukh Khan : 'जवान'मधील 'तो' सीन लीक

Shah Rukh Khan Jawan Leaked Online : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असून या वर्षात त्याचे आणखी दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) सिनेमाचं शूटिंग करत असून आता या सिनेमातील शुटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 








 






Lakme Fashion Week : शिल्पा शेट्टी ते सोनाक्षी सिन्हा; लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा

Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशनवीकमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी ते सोनाक्षी सिन्हापर्यंत अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला होता. 

Oscars 2023 : आता ऑस्करमध्ये रेड नव्हे व्हाइट कार्पेट

Oscars 2023 : 95 वा 'ऑस्कर पुरस्कार सोहळा' (Oscar Awards 2023) येत्या 12 मार्चला लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. पण 62 वर्षांत पहिल्यांदाच कार्पेटचा रंग लाल नसल्याची माहिती समोर आली आहे. पण यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट नसणार आहे. यंदा कार्पेटचा रंग बदलण्यात आला आहे. कार्पेटचा रंग बदलण्यात आल्याने सेलिब्रिटी मात्र नाराज झाले आहेत.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


नंदेश उमपची नवी भूमिका; 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत दिसणार संत सेना महाराजांच्या भूमिकेत


'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. आता या मालिकेत नंदेश उमपची (Nandesh Umap) एन्ट्री होणार आहे. 


गोरेगावातील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये भीषण आग


मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये (Dadasaheb Phalke Film City) भीषण आग लागली आहे. फिल्म सिटी मधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता आहे. 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेच्या सेटला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या आहेत.


कोरोनाकाळावर भाष्य करणारा राजकुमार रावचा 'भीड'


Rajkummar Rao Bhumi Pednekar Bheed Trailer Out : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumaar Rao) आणि भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) आगामी 'भीड' (Bheed) या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) 'भीड'चा ट्रेलर (Bheed Trailer Out) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमध्ये कोरोनाकाळ, त्यावेळची परिस्थिती, कोरोनाकाळात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. कोरोनाकाळत वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. कोरोनाकाळात सरकार आणि व्यवस्थेची भूमिका काय होती हे या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.