Oscar 2023: यंदाचा ऑस्कर असणार खास; कुठे पाहता येणार पुरस्कार सोहळा? जाणून घ्या एका क्लिकवर
ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? असा प्रश्न भारतातील प्रेक्षकांना पडला असेल.
Oscar 2023: 95 व्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. 95 वा अकादमी पुरस्कार रविवारी (12 मार्च) लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. 12 मार्चला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (95th Oscars LIVE ) प्रेक्षकांना बघता येईल. हा पुरस्कार सोहळा कुठे पाहता येईल? असा प्रश्न भारतातील प्रेक्षकांना पडला असेल. जाणून घेऊयात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या प्रक्षेपणाबाबत...
अमेरिकेतील प्रेक्षकांना Hulu Live TV, YouTube TV, AT&T TV आणि Fubo TV यावर ऑस्करचे थेट प्रक्षेपण बघायला मिळणार आहे. या प्लॅटफॉर्मवर पुरस्कार सोहळ्यात घडणाऱ्या सर्व अॅक्टिव्हिटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातील. तसेच ऑस्करच्या ट्विटर हँडलवर या अवॉर्ड शोबद्दलचे प्रत्येक अपडेट आणि विजेत्यांची यादी जाहीर केली जाईल.
भारतीय प्रेक्षकांना ऑस्कर पुरस्कार सोहळा कुठे पाहायला मिळेल?
भारतात ऑस्कर 2023 हा चित्रपट पुरस्कार सोहळा तुम्ही एबीसी नेटवर्क केबल, सीलिंग टीव्ही, हुलू प्लस लाइव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर पाहू शकता. ऑस्करच्या ट्विटर हँडलवर तुम्ही या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट्स पाहू शकता. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट्स तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला ऑस्कर 2023 या पुरस्कार सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स मिळतील.
Find out how you can watch the 95th Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95 https://t.co/OGDntiA2Hw
— The Academy (@TheAcademy) March 9, 2023
भारतासाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा खास
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. भारतीयांच्या नजरा 95 व्या ऑस्कर पुरस्कारावर (ऑस्कर 2023) खिळल्या आहेत. कारण साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील 'नाटू नाटू'ला (Naatu Naatu) ऑस्कर 2023 साठी बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात (Golden Globe Awards 2023) सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग मोशन पिक्चर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला होता. आता आरआरआर चित्रपटाची टीम भारतात ऑस्कर घेऊन येईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार 'नाटू नाटू' वर परफॉर्मन्स; 'हे' कलाकार करणार परफॉर्म