Entertainment News Live Updates 11 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Jan 2023 07:03 PM
Me Vasantrao : जगभरातील 300 पेक्षा अधिक सिनेमांच्या यादीत 'मी वसंतराव'चा समावेश

Me Vasantrao Movie : 'द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस' (Academy of Motion Picture Arts and Sciences) कडून 95 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगभरातील 300 हून अधिक सिनेमांच्या यादीत जीओ स्टुडिओजच्या 'मी वसंतराव' (Me Vasantrao) या चित्रपटाचा समावेश झाला आहे.





Tunisha Sharma Case : शिझान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला सुनावणी

Sheezan Khan Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिझान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण त्याला आजही जामीन मिळालेला नाही. 

Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते'चा थरारक आठवडा

Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' (Tumchi Mulgi Kay Karte) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेचा विशेष भाग पार पडणार आहे. 





Tunisha Sharma Case : शिजान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला फैसला होणार

 Tunisha Sharma Case :तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज ही जामीन नाही. शिजान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला फैसला होणार आहे.

Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी गोडसे एक युद्ध'चा ट्रेलर आऊट

Gandhi Godse Ek Yudh Trailer Out Now : 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. 


Swapnil Joshi : स्वप्नील जोशीचा 'Chala Hawa Yeu Dya'ला रामराम

Swapnil Joshi On Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. अशातच आता स्वप्निल जोशीने (Swapnil Joshi) 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

Gadad Andhar: 'गडद अंधार' मधील 'दरिया, दरिया...' गाणं प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Gadad Andhar: मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करण्यात येत असल्याने 'गडद अंधार' (Gadad Andhar) हा आगामी मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटाची उत्सुकता टिझर रिलीज झाल्यापासून वाढली आहे. आता या चित्रपटातील नवं कोरं धमाकेदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'गडद अंधार' मधील 'दरिया, दरिया...' (Dariya) हे गाणं नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलं आहे. टेक्निकली खूप दर्जेदार असलेल्या या सुमधूर गीतावर अल्पावधीत लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका अनोख्या विश्वाची सफर घडवणाऱ्या 'गडद अंधार' चित्रपटाची झलक 'दरिया, दरिया...' या गाण्यात पहायला मिळते.


Vanita Kharat : वनिता खरात अडकणार लग्नबंधनात

Vanita Kharat Wedding Date : वनिता खरात (Vanita Kharat) हे नाव आता घराघरांत पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. पण आता ती खरचं लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी ती सात फेरे घेणार आहे.





Akshay Kelkar : राखी सावंत 'बिग बॉस'ची बायको : अक्षय केळकर

Bigg Boss Marathi Winner Akshay Kelkar On Rakhi Sawant : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 4) नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. या पर्वात अक्षय केळकरने (Akshay Kelkar) बाजी मारली. या पर्वात सर्वसामान्य माणसांपासून ते बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतपर्यंत (Rakhi Sawant) अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. राखीच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरातील सर्वचं स्पर्धकाचं चांगलंच मनोरंजन झालं होतं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत 'बिग बॉस मराठी 4'चा (Bigg Boss Marathi 4 Winner) विजेता अक्षय केळकर म्हणाला,"राखी सावंत बिग बॉसची बायको आहे". 

Golden Globe Awards 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरआरआरच्या टीमला दिल्या शुभेच्छा; ट्वीट शेअर करत म्हणाले, 'भारतीयांना अभिमान'

Golden Globe Awards 2023: 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन आरआरआर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 





Exclusive Akshay Kelkar Bigg Boss Marathi Winner : रिक्षा चालकाचा मुलगा ते ; 'बिग बॉस'चा विजेता

Akshay Kelkar Bigg Boss Marathi Winner : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या प्रर्वाचा (Bigg Boss Marathi 4) अक्षय केळकर (Akshay Kelkar) विजेता ठरला आहे. एका रिक्षा चालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता हा प्रवास नक्की कसा घडला जाणून घ्या.. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय (Bigg Boss Marathi Winner) म्हणाला,"एक घर, 19 स्पर्धक आणि दिवसांचा प्रवास खूप खडतर होता. क्षणोक्षणी अपमान होत असल्याने हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक वाटेवर हा प्रवास खडतर होता. 'बिग बॉस'मध्ये सतत ट्वीस्ट येत होते. त्यामुळे हा प्रवास खडतर होत चालला होता. पण खडतर वाटेवरचं सुख मिळतं". 


Exclusive Akshay Kelkar Bigg Boss Marathi Winner : रिक्षा चालकाचा मुलगा ते ; 'बिग बॉस'चा विजेता; जाणून घ्या अक्षय केळकरचा प्रवास...


Golden Globe Awards 2023: 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा संपन्न; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Golden Globe Awards 2023: 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा (Golden Globe Awards 2023) लॉस अँजेलिस, कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये पार पडला आहे. जेरॉड कारमाइकल  (Jerrod Carmichael) यांनी हा सोहळा होस्ट केला होता. अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. पाहूयात या गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Golden Globe Awards 2023: Best Picture - Musical/Comedy या कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार इनिशेरिनच्या बनशीस यांना मिळाला आहे

Golden Globe Awards: Best Picture - Musical/Comedy या कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार इनिशेरिनच्या बनशीस यांना मिळाला आहे.





Golden Globe Awards 2023: पॉल वॉल्टर हॉसरला मिळाला गोल्डन ग्लोब पुरस्कार

Golden Globe Awards 2023:  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता टेलिव्हिजन लिमिटेड मालिका/मोशन पिक्चर या कॅटेगिरीचा पुरस्कार पॉल वॉल्टर हॉसर यांना मिळाला आहे. 



Golden Globe Awards 2023: सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर (नॉन इग्लिश) कॅटेगिरीमधील पुरस्कार अर्जेंटिना 1985 या चित्रपटानं पटकावला आहे. 

Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब अवॉर्डमधील (Golden Globe Awards) सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर (नॉन इग्लिश) कॅटेगिरीमधील पुरस्कार अर्जेंटिना 1985 या चित्रपटानं पटकावला आहे. 



Golden Globe Awards 2023: मोशन पिक्चर ड्रामा कॅटेगिरीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलरला मिळाला आहे.



Golden Globe Awards 2023: टेलिव्हिजन मालिका सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार टायलर जेम्स विल्यम्स यानं पटकावला

Golden Globe Awards 2023: टेलिव्हिजन मालिका सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार टायलर जेम्स विल्यम्स यानं पटकावला आहे.



Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार आरआरआरमधील 'नाटू नाटू' नं पटकावला

Golden Globe Awards 2023: सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) आरआरआरमधील (RRR) नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याला मिळाला आहे. 



Oscars 2023: आरआरआर ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत; शाहरुखनं राम चरणकडे केली 'ही' मागणी; ट्वीट शेअर करत म्हणाला, 'प्लिज मला...'

Oscars 2023:  ऑस्करनं  (Oscars 2023) जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये अवतार- द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water), भारतातील कांतारा (Kantara), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) 'मी वसंतराव' (Me Vasantrao) , तुझ्यासाठी काहीही (Tujhya Sathi Kahi Hi) या सिनेमांच्या नावांचा समावेश झाला आहे. आरआरआर या चित्रपटाचा देखील समावेश ऑस्करच्या रिमांडर लिस्टमध्ये झाल्यानं अनेक लोक या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत. आरआरआरमधील अभिनेता राम चरणकडे नुकतीच शाहरुखनं एक मागणी केली आहे. एक ट्वीट शेअर करुन शाहरुखनं ही मागणी राम चरणकडे केली. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


"माझी जाहीरपणे माफी माग, स्वतःचे गुन्हे कबुल कर"; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खानला थेट इशारा


Somy Ali on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि त्याचे अफेअर्स सर्वश्रुतच... त्याचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सलमानच्या अशाच एका गाजलेल्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चर्चा रंगल्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे. सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणजे, नव्वदीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री. एकेकाळी सोमी अली (Somy Ali) आणि सलमान खानच्या अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूड गाजवलं होतं. सध्या सोमी अली चर्चेत अली आहे ती तिनं पुन्हा एकदा सलमान खानवर केलेल्या आरोपांमुळे. 


Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं शूटिंग कसं झालं? जाणून घ्या एकाचवेळी कसं जमवलं अभिनय अन् दिग्दर्शन...


Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)


आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".


Entertainment : IMDb द्वारे 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा; पाहा चित्रपटांची यादी


Entertainment News : अनेकदा चित्रपटाचे रिव्ह्यू वाचून, किंवा लोकांशी संवाद साधून नाहीतर मग तो चित्रपट स्वत: पाहून इतरांना सांगणे हे बऱ्याचदा होत असते. पण प्रेक्षकांनी कोणते सिनेमे पाहावेत. कोणत्या सिनेमांबाबत उत्सुकता आहे. याबाबत IMDb माहिती देते. IMDb च्या मासिक 20 कोटी यूजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.


IMDb ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीज संदर्भातील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोताद्वारे आज 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा केली गेली. पूर्ण 2022 मधील IMDb यूजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी निर्धारित केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.