Entertainment News Live Updates 11 August: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Aug 2022 03:11 PM
Fabulous Lives Of Bollywood Wives चा दुसरा सिझन येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Ananya Pandey : अनन्या पांडेनं सेलिब्रेट केलं रक्षाबंधन; शेअर केले खास फोटो

Yash: केजीएफ स्टार यशचं रक्षाबंधन सेलिब्रेशन

Sanjay Dutt : संजय दत्तनं रक्षाबंधनच्यानिमित्तानं शेअर केला खास फोटो

Salman Khan : सलमाननं घेतली भारतीय नौदलाच्या जवानांची भेट


Lal Singh Chaddha : इरफान पठाणनं केलं लाल सिंह चड्ढा चित्रपटाचं कौतुक

'रौंदळ'चा टीझर लाँच; मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'कार्तिकेय 2'चा ट्रेलर आऊट


'कार्तिकेय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. 'कार्तिकेय' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.


'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज


ओटीटीवरील 'दिल्ली क्राईम' या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. दिल्ली क्राईमचा पहिला सिझन हा दिल्लीमधील चर्चित निर्भया प्रकरणावर आधारित होता. आता या नव्या सिझनमधील मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये शेफाली शाह दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील शेफालीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.


Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर वीरेंद्र सहवाग आणि सुरेश रैनाची प्रतिक्रिया; म्हणाले...


Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता आमिर खानचा  (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नुकतच या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी तसेच चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली होती. स्क्रिनिंगचा व्हिडीओ आमिर खान प्रोडक्शन्स या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिकेटर वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) आणि सुरेश रैना (Suresh Raina) हे चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 


Laal Singh Chaddha : 'आमिरला ट्रोल करण्यासाठी दिले जातायत पैसे'; बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर दिग्दर्शक अद्वैत चंदनची प्रतिक्रिया


Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या त्याच्या  'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या आमिर आणि करीना या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बायकॉट लाल सिंह चड्ढा हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.  बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर प्रसिद्ध दिग्दर्शक अद्वैत चंदनने (Advait Chandan) प्रतिक्रिया दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.