Entertainment News Live Updates 10 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 May 2023 04:39 PM
Ulajh : जान्हवी कपूरचा 'उलझ' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Janhvi Kapoor In Movie Ulajh : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. त्यामुळे तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. जान्हवीचा 'उलझ' (Ulajh) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वाचा सविस्तर





Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत आस्ताद काळेची एन्ट्री

Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही नवी थरारक मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. आता या मालिकेत आस्ताद काळेची (Astad Kale) एन्ट्री होणार आहे. 


Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत आस्ताद काळेची एन्ट्री; आता दिसणार नेत्याच्या भूमिकेत

Sudipto Sen : 'The Kerala Story' बनवणारे सुदीप्तो सेन कोण आहेत?

Sudipto Sen The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून अनेक सिनेमांवर टीका होत आहे. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेले हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र यशस्वी होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुदीप्तो सेनने (Sudipto Sen) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


वाचा सविस्तर

IIFA 2023 : ठरलं; 'या' दिवशी पार पडणार 'आयफा 2023'; सिने तारे तारकांच्या उपस्थितीत पार पडणार दिमाखदार पुरस्कार सोहळा

IIFA Awards 2023 : 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (IIFA 2023) सोहळा लवकरच पार पडणार आहे. या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याची सिने तार तारकांना उत्सुकता आहे. नेहमीप्रमाणे यंदाही अबू धाबीमध्येच (Abu Dhabi) यंदाचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 


IIFA 2023 : ठरलं; 'या' दिवशी पार पडणार 'आयफा 2023'; सिने तारे तारकांच्या उपस्थितीत पार पडणार दिमाखदार पुरस्कार सोहळा

Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आता कार्तिकला धडा शिकवणार आहे.

Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आता कार्तिकला धडा शिकवणार आहे. 





Adipurush Trailer Launch: 'आदिपुरुष'च्या ट्रेलर लाँचला थिएटरमध्ये बसायला नव्हती जागा; क्रितीनं केलं असं काही की, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Adipurush Actress Kriti Sanon'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला.  या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चित्रपटामधील सर्व स्टार कास्टने  हजेरी लावली. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री क्रिती सेननला (Kriti Sanon) बसायला जागा मिळत नव्हती. ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही बसायला जागा मिळत नसल्यानं ट्रेलर पाहण्यासाठी खाली बसते. 



Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अखेर आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे. सध्या या मालिकेत इशाची लगीनघाई सुरू असून लवकरच तिला साखरपुडा होणार आहे. दरम्यान मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. 





The Kerala Story Box Office Collection : 'द केरळ स्टोरी'ची धडाकेबाज हाफ सेंच्युरी; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

The Kerala Story Box Office Collection Day 5 : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काही ठिकाणी या सिनेमाला विरोध होत आहे. तर काही ठिकाणी मात्र या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहे. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.


The Kerala Story Box Office Collection : 'द केरळ स्टोरी'ची धडाकेबाज हाफ सेंच्युरी; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत नवी-दिल्लीत होणार साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement Details : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पण त्या दोघांनीही अजून त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पण आता त्यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे.

Mumbai : चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai : चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 38 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीची दखल घेत मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बलात्कार, मारहाण व धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Man Dhaga Dhaga Jodte Nava: ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेचा पहिला एपिसोड कसा होता?


Man Dhaga Dhaga Jodte Nava :  ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही नवी  प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही नवी मालिका  प्रेक्षक  सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता  बघू शकतात. नुकतीच सोशल मीडियावर या मालिकेबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये नेटकऱ्यांना ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या पहिल्या एपिसोडबद्दल विचारण्यात आलं. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर बच्चे कंपनीने केला कब्जा


Chala Hawa Yeu Dya:  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये लवकरच बच्चे कंपनी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमामध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री होणार आहे. सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बच्चे कंपनी  'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर खेळताना दिसत आहेत. 
झी-मराठी आणि मायरा वैकुळ यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये सर्व बच्चे कंपनी हे  'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर खेळताना दिसत आहेत. 'चला हवा येऊ द्या' च्या सेट वर बच्चे कंपनीने कब्जा केला आहे.' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ' या व्हिडीओमध्ये बम बम बोले मस्ती में डोले हे गाणं ऐकू येत आहे. 


KL Rahul : आज केएल राहुलच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया


KL Rahul Health Update : सध्या सर्वत्र आयपीएल (IPL 2023) फीवर पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (Indian Premier League) अनेक खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यातीलच एक म्हणजे भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल (IPL) फ्रेंचायझी लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul). दुखापतीमुळे आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर गेलेल्या केएल राहुलवर आज, 9 मे रोजी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. त्याची दुखापत गंभीर असल्याने तो आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. शिवाय तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही (WTC Final 2023) मुकणार आहे. आज त्याच्या मांडीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.