Entertainment News Live Updates 10 August: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Criminal Justice 3 : ओटीटी (Ott) विश्वात पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) नाव आदराने घेतले जाते. अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये पंकजने काम केलं आहे. पंकजची 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice) ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राजू यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
Spider Man : स्पायडर मॅनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्पायडर मॅनला (Spider Man) आता 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्पायडर मॅनचा मोठा चाहतावर्ग आहे. स्पायडर मॅनच्या पुस्तकांनी, सिनेमांनी 60 वर्षांचा टप्पा पार केला आहे. 1970 साली स्पायडर मॅन चाहत्यांच्या भेटीला आला.
Man Udu Udu Zhala : Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिकेत आनंदी-आनंद पाहायला मिळत आहे. इंद्रा-दीपू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. कार्तिक आणि सानिका सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिका आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे मालिकेतील इंद्राने म्हणजेच अजिंक्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'देवा देवा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'केसरिया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले. आता या सिनेमातील 'देवा देवा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'कार्तिकेय 2'चा ट्रेलर आऊट
'कार्तिकेय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. 'कार्तिकेय' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.
'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज
ओटीटीवरील 'दिल्ली क्राईम' या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. दिल्ली क्राईमचा पहिला सिझन हा दिल्लीमधील चर्चित निर्भया प्रकरणावर आधारित होता. आता या नव्या सिझनमधील मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये शेफाली शाह दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील शेफालीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या आमिर आणि करीना या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बायकॉट लाल सिंह चड्ढा हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर प्रसिद्ध दिग्दर्शक अद्वैत चंदनने (Advait Chandan) प्रतिक्रिया दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -