Entertainment News Live Updates 08 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 May 2023 03:05 PM
Priya Bapat: 'मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं?'; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रियाचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक नेटकरी तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. प्रिया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच प्रियानं वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


 




The Kerala Story: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी'ला शबाना आझमींचा सपोर्ट; ट्वीट शेअर करत म्हणाल्या...

The Kerala Story:   'द केरळ स्टोरी' (The Kerala Story)  हा चित्रपट काल (5 मे)  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. या चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  (Shabana Azmi) यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्ररटाला ट्वीट शेअर करुन सपोर्ट केला आहे. 



Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री

Myra Vaikul New Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेच्या माध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षी छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी मायरा वैकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे. मराठी मालिका विश्व गाजवल्यानंतर मायरा आता हिंदी मालिकेत एन्ट्री करत आहे. 



Priyanka Chopra Daughter : प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचा आवाज चाहत्यांनी पहिल्यांदाच ऐकला; 'देसी गर्ल'ने शेअर केला व्हिडीओ

Priyanka Chopra With Daughter Malti Mary : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने लाडकी लेक मालतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालतीचा आवाज ऐकू येत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकला आहे.



The Kerala Story : कुठे मोफत शो तर कुठे महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग; भाजप नेत्यांचा 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा!

The Kerala Story Maharashtra Special Show : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. 'द कश्मीर फाइल्स'प्रमाणे (The Kashmir Files) 'द केरळ स्टोरी'लादेखील मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमाचे नेत्यांकडून खास शो आयोजित केले जात आहेत. देशभरात या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आणि महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात येत आहे. 


वाचा सविस्तर

TMKOC : प्रतीक्षा संपली! अखेर 15 वर्षांनी टप्पू सोनूला प्रपोज करणार

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Latest Update : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. मालिकेत टप्पू सोनूला कधी प्रपोज करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मालिकेच्या आगामी भागात टप्पू सोनूला प्रपोज करणार आहे. 





The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली तब्बल 35.75 कोटींची कमाई

The kerala Story Box Office Collection : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर वीकेंडलादेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 


वाचा सविस्तर

The Kerala Story : दिल्लीत केरळ स्टोरी चित्रपट करमुक्त करावा; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पत्र

The Kerala Story : दिल्लीत केरळ स्टोरी चित्रपट करमुक्त करावा, तसेच महिला आणि तरुण मुलींसाठी विशेष स्क्रिनींग ठेवण्याची मागणी दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना करण्यात आली आहे. 

Sukesh Chandrasekhar Case : सुकेश चंद्रशेखरचं 'बेबी गर्ल' जॅकलिन फर्नांडिसला आणखी एक प्रेम पत्र

Sukesh Chandrasekhar On Jacqueline Fernandez : 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे दिल्ली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) 'बेबी गर्ल' जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) आणखी एक प्रेमपत्र लिहिलं आहे. पत्रात जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्त एक मोठे सरप्राईज प्लॅन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 11 ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे. 


वाचा सविस्तर

The Kerala Story : महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने केदार शिंदे संतापले

Kedar Shinde On The Kerala Story : केदार शिंदेंचा (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? असा सवाल करत दिग्दर्शक केदार शिंदेंनी ट्विट केलं आहे.





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीचं नवं पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Khatron Ke Khiladi 13: छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे कलाकार आता त्यांच्या आयुष्यात संकटांना सामोरे जाताना दिसणार आहेत. कर्लस टिव्हीवरील धमाकेदार कार्यक्रम 'खतरों के खिलाडी'च्या (Khatron Ke Khiladi) 13 व्या पर्वाची प्रेक्षक खूप आतूरतेने वाट बघत आहेत. तसेच या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दलची देखील उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे. म्हणूनच 'खतरों के खिलाडी'बद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हांला देणार आहोत. 


Sara Ali Khan Vicky Kaushal : सारा अली खान अन् विकीचा अनटायटल्ड सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Sara Ali Khan Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) अनटायटल्ड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे. सारा अली खान आणि विकी कौशलच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या सिनेमाची रिलीज डेट मात्र समोर आली आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यानंतर 'फुकरे 3' या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. 


Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ


Maharashtrachi Kitchen Queen : छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कथाबाह्य कार्यक्रम असतात. असच खवय्येगिरीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक नवा खमंग असा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम 15 मे पासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.