Entertainment News Live Updates 04 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Apr 2023 03:36 PM
Yentamma Song Out : सलमानचा लुंगी अवतार; राम चरण आणि वेंकटेश दग्गुबातीसोबत थिरकला 'Yentamma' गाण्यावर

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Yentamma Song Out : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. आता या सिनेमातील 'येंतम्मा' (Yentamma Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील सलमानचा दाक्षिणात्य लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 





Milind Gawali : "आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची"; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind Gawali : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर गोशाळेतील एक व्हिडीओ शेअर करत तेथील सुखद अनुभवावर भाष्य केलं आहे. 





Ayan Mukerji: अयान मुखर्जी करणार 'वॉर 2' चे दिग्दर्शन? ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दोन भागांबाबत देखील दिली मोठी अपडेट

Ayan Mukerji: फिल्ममेकर अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) नुकतीच सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करुन 'ब्रह्मास्त्र भाग 2: देव' (Brahmastra Part 2: Dev) आणि 'ब्रह्मास्त्र भाग 3' (Brahmastra Part 3) ची टाइमलाइन जाहीर केली. अयाननं या पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती एकाच वेळी केली जाणार आहे. 'ब्रह्मास्त्र भाग 2: देव' हा चित्रपट 2026 मध्ये तर 2027 मध्ये 'ब्रह्मास्त्र भाग 3' रिलीज केला जाईल असंही त्यानं या पोस्टच्या माध्यामतून चाहत्यांना सांगितलं. या पोस्टमध्ये अयाननं त्याच्या एका 'स्पेशल' चित्रपटाचा देखील उल्लेख केला आहे. हा चित्रपट कोणता आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.



Extraction 2 चा जबरदस्त टीझर रिलीज; ख्रिस हेमन्सवर्थ अॅक्शन मोडमध्ये

Extraction 2 Teaser: नेटफ्लिक्सवर (Netflix) विविध हॉलिवूड फिल्म्स रिलीज होत असतात. लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी (Ott) प्लॅटफॉर्मवर एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) हा चित्रपट रिलीज होणार आहे.  एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) या हॉलिवूड (Hollywood Movie) फिल्मची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिला भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. एक्स्ट्रॅक्शन 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा  जबरदस्त टीझर नुकताच रिलीज केला आहे. सध्या या टीझरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या टीझरमध्ये अभिनेता ख्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemnsworth) हटके अंदाज पहायला मिळत आहे.


पाहा टीझर





Gautami Patil : विराट कोहली की धोनी? गौतमी पाटील म्हणाली, धोनी; पण मुंबई इंडियन्स की सीएसके विचारल्यावर मात्र...





xGautami Patilगौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी  वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  That Odd Engineer या युट्यूब चॅनलनं गौतमी पाटीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गौतमीला विविध विषयांबाबत प्रश्न विचारण्यात आले.








Dasara Box Office Collection : रिलीजच्या पाचव्या दिवशी नानीचा 'दसरा' बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला

Dasara Box Office Collection : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या सटल अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नानीचा (Nani Keerthy) 'दसरा' (Dasara) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण आता सोमवारी रिलीजच्या पाचव्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार साखरपुडा?

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि 'आप'चे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं समोर आलं आहे. 





Priyanka Chopra : "मी फक्त सत्य सांगितलं"; बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्राने अखेर मौन सोडलं

Priyanka Chopra On Discrimination In Bollywood : हिंदी सिनेसृष्टीसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या 'सिटाडेल' (Citadel) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी 'देसी गर्ल'ने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलं होतं. आता 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी प्रियंका भारतात आली असून बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर तिने अखेर मौन सोडलं आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhausaheb shinde: दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध, भाऊसाहेब शिंदेंचा दावा


Bhausaheb shinde: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb shinde) यांनी केलाय. इतकच नाही तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे (pakistan) नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदेंनी केला आहे. दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. 


Ishaan Khatter Hollywood Debut: ईशान खट्टरला मिळाली हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी


Ishaan Khatter Hollywood Debut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) भाऊ ईशान खट्टर (Ishaan Khatter) लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ईशानला निकोल किडमॅन आणि लिव्ह श्रेबर यांच्यासोबत 'द परफेक्ट कपल' या प्रोजेक्टमध्ये कास्ट करण्यात आले आहे. ईशाननं त्याच्या या नव्या हॉलिवूड प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.


Sir Madam Sarpanch : 'सर मॅडम सरपंच'चा ट्रेलर आऊट


Sir Madam Sarpanch Movie : 'सर मॅडम सरपंच' (Sir Madam Sarpanch) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमात सीमा बिस्वास (Seema Biswas) आणि एरियाना सजनानी (Ariana Sajnani) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सर मॅडम सरपंच'च्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक प्रवीण मोरछलेने (Praveen Morchhale) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर सनकॅल प्रोडक्शनच्या (Suncal Production) बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.