Entertainment News Live Updates 02 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Satyajit Ray Memorical Awards Winner Ashok Rane : सिने-समीक्षक अशोक राणे (Ashok Rane) यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील लेखनासाठी तसेच चित्रपट समीक्षा लेखन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
Bhaurao Karhade TDM Marathi Movie : भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांना 'ख्वाडा'आणि 'बबन' या चित्रपटांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली. आता त्यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला थिएटलमध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं या चित्रपटाच्या टीमला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर टीडीएम या चित्रपटाच्या टीमचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटातील कलाकार भावूक झाले आहेत. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच 'टीडीएम' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. शरद पवार यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. अनेक सेलिब्रिटींनी आणि नेत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
PS 2 Box Office Collection: हिस्टॉरिकल ड्रामा फिल्म 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘PS 2’ हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Maharashtrachi Kitchen Queen: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कुकिंग शोचे नाव 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) असं आहे. या कार्यक्रमचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संकर्षण 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाची माहिती प्रेक्षकांना देत आहे.
Ajit Pawar On TDM : 'टीडीएम' सिनेमाला स्क्रिन मिळत नसल्याबद्दल आता अजित पवार यांनीदेखील ट्वीट केलं आहे.
Salman Khan : बॉलिवुड अभिनेता सलमान खानला धमक्या मिळणं अजूनही थांबलेलं नाही. त्याला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आला होता त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. या धमक्यांमुळे सलमान खानने दुबई सुरक्षित आहे पण सुरक्षेची समस्या भारतात येते असं वक्तव्य एका मुलाखतीत सलमान खानने केलं होतं त्यावर आज उपमुख्यमँत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान केलंय. सलमान खानला मुंबईत किंवा भारतात कुठेही अडचण .येणार नाही त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे.
Salman Khan : बॉलिवुड अभिनेता सलमान खानला धमक्या मिळणं अजूनही थांबलेलं नाही. त्याला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आला होता त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. या धमक्यांमुळे सलमान खानने दुबई सुरक्षित आहे पण सुरक्षेची समस्या भारतात येते असं वक्तव्य एका मुलाखतीत सलमान खानने केलं होतं त्यावर आज उपमुख्यमँत्री देवेंद्र
फडणवीसांनी विधान केलंय. सलमान खानला मुंबईत किंवा भारतात कुठेही अडचण .येणार नाही त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे.
Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाची गणना होते. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूडकरांनादेखील या कार्यक्रमाची भूरळ पडली आहे. आता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या आगामी भागात 'तेंडल्या' (Tendlya) या सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे.
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमावर टीका होत आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान मुस्लिम युथ लीगने 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची कथा खरी असल्याची सिद्ध करणाऱ्याला एक कोटी देणार असल्याची घोषणा केली आहे.
Priyanka Chopra Alia Bhatt On Met Gala 2023 : जगभरातील फॅशन डिझाईनर्ससाठी महत्त्वाचा असणारा 'मेट गाला इव्हेंट' (Met Gala 2023) नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Bhaurao Karhade On TDM Marathi Movie : 'ख्वाडा','बबन' या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Karan Gunhyala Mafi Nahi : 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' गुन्हेगारांना शोधून काढणार! आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही'
Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial Latest Update : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही थरारक मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.
Chala Hawa Yeu Dya : व्यसन सोडायचं कसं? गौर गोपाल दास यांचा भाऊ कदमला कानमंत्र
Gaur Gopal Das In Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मोटिव्हेशनल गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) हजेरी लावणार आहेत. एखादी वाईट सवय कशी सोडायची हे गौर गोपाल दास त्यांच्या शैलीत सांगणार आहेत.
Tendlya : राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'तेंडल्या' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी जागवणारा सिनेमा
Tendlya Marathi Movie : 'सचिन' म्हटलं की डोळ्यासमोर येतं खचाखच भसलेलं स्टेडियम आणि 'सचिन...सचिन...'चा तो नारा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सचिनने (Sachin Tendulkar) प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवलं. सचिनच्या या गोष्टीने प्रेरित होऊन त्याच्या एका चाहत्यानेदेखील सिनेमा बनवण्याचं स्वप्न पाहिलं. सचिनप्रमाणेच सचिन जाधव (Sachin Jadhav) या चाहत्याचंदेखील स्वप्न साकार झालं आहे. सचिन जाधवचा 'तेंडल्या' (Tendlya) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'तेंडल्या' हा मराठी सिनेमा येत्या 5 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तेंडल्या' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. सचिन तेडुंलकरनेदेखील या सिनेमाचं खूप कौतुक केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -