Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Oct 2023 08:23 PM
Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: ‘टायगर 3’ मध्ये कतरिनासोबत ‘टॉवेल फाईट’ करणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या स्टंट वुमनबाबत...

Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)  'टायगर 3' (Tiger 3) हा  बहुप्रतिक्षित चित्रपट यंदा दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे काही अॅक्शन सीन्स दिसले. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या सीनमध्ये कतरिना एका अभिनेत्रीसोबत फाईट करताना दिसत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Raj Kundra: "इंडिया में दो चीजें बिकती है, एक है सेक्स, दुसरी..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे बेधडक वक्तव्य!

Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra)  हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकताच UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये राज कुंद्रानं विविध वक्तव्ये केली आहेत. पण सध्या त्याच्या एका वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 



Allu Arjun: फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण; हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ

Allu Arjun: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा सध्या चर्चेत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नाव कोरलं आहे. काल (17 ऑक्टोबर) नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात द्रौपदी मुर्मूंच्या (Droupadi Murmu) हस्ते अल्लू अर्जुनला पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यानंतर अल्लू अल्लून हा हैदराबादमध्ये आला. हैदराबादमध्ये चाहत्यांनी अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत केलं. 





UT 69 Trailer Out: पॉर्नोग्राफी प्रकरण अन् आर्थर रोड जेलमधील अनुभव; राज कुंद्राच्या UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

UT 69 Trailer Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra)  हा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होता. 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये  राज कुंद्रला जामीन मंजूर झाला. आता राज कुंद्रा हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा  UT 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.





Ekda Yeun Tar Bagha Teaser Out: नव्या कोऱ्या हॉटेलच्या चालक आणि मालकांची भन्नाट गोष्ट; 'एकदा येऊन तर बघा' चा धमाकेदार टीझर रिलीज!

Ekda Yeun Tar Bagha Teaser Out:  महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांची फौज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे.



Bipasha Basu: "ही तर डॉल..." ; बिपाशा बासूनं शेअर केलेल्या लेकीच्या क्युट व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष!
Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हर (Karan Singh Grover)  हे  गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आई-बाबा झाले. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचे नाव देवी असं ठेवलं आहे.  बिपाशा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. बिपाशानं नुकताच तिच्या लेकीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


Prabhas Wedding : प्रभास लवकरच अडकणार लग्नबंधनात!

Prabhas : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सुपरस्टार लोकप्रिय अभिनेता प्रभास (Prabhas) सध्या चर्चेत आहे. प्रभास अनेकदा व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. आता अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. 

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली अंकिता लोखंडे; पती विकी जैनला म्हणाली, "मला जग हर्ट करु शकत नाही पण..."

Bigg Boss 17: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बिग बॉस-17 (Bigg Boss 17) हा शो 15 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. गेल्या तीन दिवसात बिग बॉसच्या  घरात भांडण, वाद आणि स्पर्धकांमधील बाचाबाची या सर्व गोष्टी होत आहेत. शोमधील सर्व स्पर्धक त्यांचा गेम प्लॅन करत आहेत. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा विकी जैन (Vicky Jain) हे देखील बिग बॉस-17 या शोमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच अंकिता आता तिचा पती विकी जैन याच्यावर नाराज झालेली आहे. 



Koffee With Karan 8 : आयकॉनिक काऊच ते ऑरेंज मग; करण जोहरने दाखवली 'कॉफी विथ करण 8'ची झलक; पाहा व्हिडीओ

Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच करण जोहरने एक व्हिडीओ शेअर करत या कार्यक्रमाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. व्हिडीओमधील आयकॉनिक काऊच ते ऑरेंज मग अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Kunal Kapoor : लहानपणी विकले आंबे, सिनेमांत दाखवला जलवा, आज आहे कोट्यवधींच्या कंपनीचा मालक; कोण आहे अमिताभ बच्चन यांचा जावई?

Amitabh Bachchan Son In Law Kunal Kapoor Success Story : बॉलिवूडमध्ये नशीब आजमवायला देशभरातील अनेक तरुण मायानगरी मुंबईत येत असतात. पण त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक कलाकारांनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे अनेक कलाकारांनी फेम मिळाल्यानंतरही सिनेसृष्टीला अलविदा केलं आहे.

Kundara Johny Death: अभिनेते कुंद्रा जॉनी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kundara Johny Death: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कुंद्रा जॉनी (Kundara Johny) यांचे मंगळवारी (17 ऑक्टोबर) केरळमधील कोल्लम येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या 71 वर्षाी अखेरचा श्वास घेतला. 1991 मध्ये रिलीज झालेल्या गॉडफादर या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळकची धमाकेदार एन्ट्री; 'या' भूमिकेत दिसणार अभिनेता

Suyash Tilak Entry Aboli Serial : 'अबोली' (Aboli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत अभिनेता सुयश टिळकची (Suyash Tilak) धमाकेदार एन्ट्री होणार आहे. सचित राजेच्या भूमिकेत सुयश दिसणार आहे.

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरात फुलायला लागलं प्रेमाचं नातं; 'या' दोन स्पर्धकांच्या लव्हस्टोरीची चर्चा

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम आहे. 105 दिवस चालणाऱ्या या खेळात 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस 17' सुरू होऊन 24 तासही पूर्ण न होता या घरात लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि मनारा चोप्रा (Mannara Chopra) या दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचं नातं फुलायला सुरुवात झाली आहे. 

Thalapathy Vijay : थलापती विजयच्या अडचणीत वाढ; 'Leo'च्या रिलीजवर बंदी; नेमकं प्रकरण काय?

Thalapathy Vijay Leo Release Stalled : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) सध्या 'लियो' (Leo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'लियो' या सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. पण आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापती विजयच्या बहुप्रतिक्षित 'लियो' सिनेमाच्या रिलीजला 20 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. 

Zeenat Aman : झीनत अमान कपडे अन् दागिने उधारीवर घेतात; तरुणांना म्हणाल्या,"बँक खातं रिकामं करू नका"

Zeenat Aman : सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री कपडे, ज्वेलरीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या लाखो रुपये खर्च करतात. या सेलिब्रिंटीकडून प्रेरित होऊन तरुण मंडळीदेखील त्यांच्या लूकवर पैसे खर्च करतात. पण अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. झीनत कपडे आणि दागिने उधारीवर घेतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Fighter : हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट! 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज

Deepika Padukone Hrithik Roshan Fighter New Poster Out : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या 'फायटर' (Fighter) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे.

Meera Borwankar : मीरा बोरवणकरांच्या 'त्या' कामगिरीवर आधारित 'हा' सिनेमा; राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

Meera Borwankar : मीरा बोरवणकर यांच्या जळगाव सेक्स स्कँडलमधील कामगिरीने प्रेरित होऊन 'मर्दानी' (Mardaani) या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात राणी मुखर्जी यांनी साकारलेल्या पोलिस ऑफिसरचं नाव शिवानी शिवाजी रॉय आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 

Thalapathy Vijay : थलापती विजयच्या 'Leo'ने रचला इतिहास; रिलीजआधीच केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई

Thalapathy Vijay Leo Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' (Leo) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवत आहेत. आता 'लियो' (Leo) या सिनेमाने रिलीजआधीच 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Aatmapamphlet Marathi Movie : "अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत"; ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, "शेवटी मराठी सिनेमा आणि..."


Aatmapamphlet Marathi Movie:  आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या कथानकाचं आणि या चित्रपटामधील कलाकारांचे कौतुक केले. पण आता आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे (Ashish Bende) यानं फेसबुकवर पोस्ट शेअर करुन एक खंत व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.


Shashank Ketkar: "निदान आज तरी..."; सिग्नलबद्दल शशांक केतकरनं केली पोस्ट, शेअर केला 'हा' फोटो


Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो.  शशांक केतकर हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बरोबरच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील चर्चेत असतो.  नुकतीच शशांकनं इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. शशांकनं  या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे  आवाहन केले आहे. 


Salaar Poster Out: पृथ्वीराज सुकुमारनच्या 'सालार' मधील जबरदस्त लूकनं वेधलं लक्ष; अभिनेता चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका


Salaar Poster Out: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा (Prithviraj Sukumaran) काल 40 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सालार’ (Salaar) या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मेकर्सनं प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं. सालार चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. पृथ्वीराज सुकुमारनच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजच्या लूकचे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज हा  नाकात रिंग, इअरिंग्स आणि गळ्यात चोकर आणि कपाळावर टिळा अशा लूकमध्ये दिसत आहे. पृथ्वीराजच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीराजच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.