Entertainment News Live Updates अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व ते फायटर चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Aug 2023 03:01 PM
Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार

Sharad Ponkshe On Me Nathuram Godse Boltoy Drama : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं. एकीकडे हे नाटक गाजत असताना दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे.


Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार

Sunny Deol : "हिंदी सिनेसृष्टीला 'बॉलिवूड' म्हणू नका" सनी देओलचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला,"हिंदुस्तान जिंदाबाद है और रहेगा"

Sunny Deol On Bollywood Hindi Movies : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. दरम्यान हिंदी सिनेमांना बॉलिवूड म्हणू नका, असं वक्तव्य सनी देओलने केलं आहे.

Bharat Jadhav: भरत जाधवचं नवं नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Bharat Jadhav:  नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा भरत जाधव  (Bharat Jadhav)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. भरतनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.  आता त्याचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या नाटकाबद्दल नुकतीच भरतनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.



Ravi Jadhav : 'ताली'च्या शूटिंगदरम्यान गौरी सावंत आल्या अन् सुष्मिता सेनला पाहून म्हणाल्या,"मैं बहुत अच्छी.."; रवी जाधव यांनी सांगितला किस्सा

Ravi Jadhav On Sushmita Sen Taali Web Series : अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) मुख्य भूमिका असलेली 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) लिहिलेल्या या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी सांभाळली आहे. 'ताली'सारख्या सीरिजमुळे समाज एक टक्का जरी बदलला तरी मी यशस्वी झालो, असं वक्तव्य रवी जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. 


Ravi Jadhav : 'ताली'च्या शूटिंगदरम्यान गौरी सावंत आल्या अन् सुष्मिता सेनला पाहून म्हणाल्या,"मैं बहुत अच्छी.."; रवी जाधव यांनी सांगितला किस्सा

Hardeek Joshi : राणादाची नवी भूमिका... 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत दिसणार परदेशी बिझनेसमनच्या भूमिकेत

Hardeek Joshi Entry In Tuzech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत प्रेक्षकांच्या लाडक्या राणाची एन्ट्री होणार आहे. राणादाच्या नव्या भूमिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आता अभिनेता हार्दिक जोशीची (Hardeek Joshi) एन्ट्री होणार आहे.


Hardeek Joshi : राणादाची नवी भूमिका... 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत दिसणार परदेशी बिझनेसमनच्या भूमिकेत

The Vaccine War : विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'ची रिलीज डेट जाहीर! सत्य घटनेवर आधारित असणार सिनेमा

Vivek Agnihotri The Vaccine War Release Date Out : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आज स्वातंत्र्यदिनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 



BB OTT 2: बिग बॉस OTT 2 च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "लोकांनी दिलेलं प्रेम...."

BB OTT 2: बिग बॉस OTT 2 चा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडला. बिग बॉस OTT 2 (Bigg Boss OTT- 2) चा होस्ट सलमान खानने एल्विश यादवला या सीझनचा विजेता घोषित केले. अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) रिअॅलिटी शोचा फर्स्ट रनर अप तर मनिषा राणी ही या कार्यक्रमाची सेकंड रनर अप ठरली. अभिषेक उर्फ ​​फुकरा इन्सान हा ग्रँड फिनाले एपिसोड दरम्यान आजारी पडला होता. आता शो संपल्यानंतर अभिषेक मल्हानने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिषेक मल्हानन चाहत्यांचे आभार मानले.



Movies : रजनीकांत हिट.. बॉलिवूड सुखावलं...मराठी मनोरंजनसृष्टीही बहरली; स्वातंत्र्यदिनी आणि काय हवं?

Bollywood Marathi South Movies Independence Day 2023 : देशात आज 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer), सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2), अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' (OMG 2) आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षक आज पाहू शकतात. 


Movies : रजनीकांत हिट.. बॉलिवूड सुखावलं...मराठी मनोरंजनसृष्टीही बहरली; स्वातंत्र्यदिनी आणि काय हवं?

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव! रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'Salman Khan) 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून एल्विश यादवने (Elvish Yadav) ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 'बिग बॉस ओटीटी'ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) उर्फ फुकरा इंसान या दोन स्पर्धकांमध्ये अंतिम लढत पाहायला मिळाली. अखेर एल्विशने यात बाजी मारली. 





Subhedar : 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; चिन्मय मांडलेकर म्हणाला,"आम्ही शिवरायांचे मावळे अडचणींवर मात करणार"

Subhedar Movie Released Date : 'सुभेदार' (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Viral Video: क्रेझ असावी तर अशी! 'गदर 2' पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स


Sunny Deol Blockbuster Hit Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वर्षांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. गदर चित्रपटाला लोकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. परिस्थिती अशी आहे की चाहते मॉलच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कारऐवजी ट्रॅक्टर आणि ट्रक पार्क करताना दिसले. प्रत्येक ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये तब्बल 20-20 लोक भरून आले होते. त्याचा हा व्हिडीओ राजस्थानातून समोर आला आहे. 


Seema Haider: सीमा हैदरने दिल्या ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; चित्रपटाची ऑफर नाकारली


Seema Haider: पाकिस्तानची  सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) या  जोडप्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सीमा आणि सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहे. 


Baipan Bhaari Deva : 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क


Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आजही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी निर्माते वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा दिवसेंदिवस वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावे करत आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा (Sairat) रेकॉर्ड मोडू शकतो. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.