Entertainment News Live Updates टीव्ही ते बॉलिवूड मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 12 Aug 2023 06:04 PM
Gadar 2 screening: गदर-2 च्या स्पेशल स्क्रीनिंगला नाना पाटेकर यांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल

Gadar 2 screening: 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट काल (11 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. शुक्रवारी 'गदर 2' प्रदर्शित होताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत (Mumbai) या चित्रपटाच्या भव्य स्क्रीनिंग आयोजित केले होते. या  स्क्रीनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 'गदर 2' चित्रपटाच्या या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. नुकताच नाना पाटेकर  (Nana Patekar) यांचा रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर हे सनी देओलला मिठी मारताना दिसत आहेत. 



Happy Birthday Sara Ali Khan : आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; सारा अली खान आज आहे कोट्यवधींची मालकीण

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूडमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. स्टार किड्ससाठी हा मार्ग तुलनेनं सोपा असतो. हिंदी सिनेसृष्टीतील अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध करणं हे खूप आव्हानात्मक असतं. पण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांना वेड लावलं आहे. आज साराचा वाढदिवस आहे. 


Happy Birthday Sara Ali Khan : आलिशान घरं, महागड्या गाड्या अन्…; सारा अली खान आज आहे कोट्यवधींची मालकीण

Kirkol Navre : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका शोधतेय 'किरकोळ नवरे'; नेमकं प्रकरण काय?

Kirkol Navre New Marathi Drama : सिनेसृष्टीसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटक येत आहेत. छोटा किंवा मोठा पडदा गाजवल्यानंतर सेलिब्रिटी मंडळी आता रंगभूमीवर पदार्पण करू लागले आहेत. आता आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर रंगभूमीवर आलेलं 'किरकोळ नवरे' (Kirkol Navre) हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.


Kirkol Navre : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका शोधतेय 'किरकोळ नवरे'; नेमकं प्रकरण काय?

Suhana Khan: किंग खानच्या लेकीचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, 'वडिलांचे संस्कार'

Suhana Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहाना (Suhana Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा आर्चिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सुहाना  ही तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.  सुहानाच्या एका व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. 



Independence Day 2023 : 'बॉर्डर' ते 'Gadar 2'; यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशभक्तीवरचे 'हे' 10 सिनेमे नक्की पाहा

Independence Day 2023 Movies : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले (Independence Day 2023) असून यंदा देशात 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्येही देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'शेरशाह' ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हे सिनेमे नक्की पाहा...


Independence Day 2023 : 'बॉर्डर' ते 'Gadar 2'; यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशभक्तीवरचे 'हे' 10 सिनेमे नक्की पाहा

Independence Day 2023 : 'बॉर्डर' ते 'Gadar 2'; यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशभक्तीवरचे 'हे' 10 सिनेमे नक्की पाहा

Independence Day 2023 Movies : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले (Independence Day 2023) असून यंदा देशात 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्येही देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'शेरशाह' ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हे सिनेमे नक्की पाहा...


Independence Day 2023 : 'बॉर्डर' ते 'Gadar 2'; यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशभक्तीवरचे 'हे' 10 सिनेमे नक्की पाहा

Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी बांधली लग्नगाठ; शेअर केले फोटो

Aanandi Joshi And Jasraj Joshi:  गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi) यांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच आनंदी आणि जसराज यांनी खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये जसराज आणि आनंदी यांच्या गळ्यात हार दिसत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी कोर्ट मॅरिज केले आहे. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंंट करुन अनेक नेटकरी या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. 



Kshitij Patwardhan : "गौरी सावंतच्या कहाण्या ऐकून कधी रडलो कधी घाबरलो"; 'ताली'चा लेखक क्षितिज पटवर्धनची पोस्ट चर्चेत

Kshitij Patwardhan ON Taali Web Series : 'ताली' (Taali) ही आगामी वेबसीरिज सध्या चर्चेत आहे.  अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या सीरिजमध्ये गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भूमिका साकारली आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) केलं आहे. आता या सीरिजच्या पडद्यामागील आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट त्याने लिहिली आहे.


Kshitij Patwardhan : "गौरी सावंतच्या कहाण्या ऐकून कधी रडलो कधी घाबरलो"; 'ताली'चा लेखक क्षितिज पटवर्धनची पोस्ट चर्चेत

Jailer Box Office Collection : नाद करायचा नाय! रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 75 कोटींची कमाई

Rajinikanth Jailer Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) मोठा चाहतावर्ग असून आजही चाहत्यांमध्ये त्याच्या सिनेमांची क्रेझ कायम आहे. सध्या त्याचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे.


Jailer Box Office Collection : नाद करायचा नाय! रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 75 कोटींची कमाई

Hemant Dhome : 'चांद्रयान 3'ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट

Hemant Dhome : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सध्या चर्चेत आहे. हेमंत कलाविश्वात अॅक्टिव्ह असण्यासोबत सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. आता मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्ड्यांचे फोटो शेअर करत त्याने संतप्त ट्वीट केलं आहे.





Box Office Collection : सनी देओलच्या 'Gadar 2'ची छप्परफाड कमाई ते अक्षय कुमारच्या 'OMG 2'चा खेळ खल्लास; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Gadar 2 OMG 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने आहेत. 


Box Office Collection : सनी देओलच्या 'Gadar 2'ची छप्परफाड कमाई ते अक्षय कुमारच्या 'OMG 2'चा खेळ खल्लास; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Champaran Mutton: ‘चंपारण मटण’ शॉर्ट फिल्म स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत; अभिनेत्री फलक खाननं व्यक्त केल्या भावना


Champaran Mutton:  'चंपारण मटण' (Champaran Mutton) या शॉर्ट फिल्मने स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या (Student Academy Awards) उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.  स्टुडंट अकादमी पुरस्काराला विद्यार्थांचा ऑस्कर देखील म्हटलं जातं. पुण्यातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील प्रतिभावान चित्रपट निर्माते रंजन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जाणून घेऊयात 'चंपारण मटण' या शॉर्ट फिल्मबद्दल...


Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने  ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण


Jaya Prada Jail : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. चेन्नई मधील रायपेटमध्ये जया प्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या चित्रपटगृहात काम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.


Gadar 2 Leaked Online : 'गदर 2' रिलीज होताच ऑनलाइन लीक; सनी देओलसह निर्मात्यांना बसला मोठा धक्का


Gadar 2 Leaked Online : अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सनीचे चाहते काही दिवसांपासून या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'गदर 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असला तरी रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.