Entertainment News Live Updates: Tiger 3 चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, सलमानच्या लूकनं वेधलं लक्ष

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Oct 2023 08:58 PM
Madhavi Nimkar: माधवी निमकरनं शेअर केला "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "काय तो आत्मविश्वास,काय तो राग..."
Madhavi Nimkar:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या मालिकेतील  शालिनी ही भूमिका अभिनेत्री  माधवी निमकर (Madhavi Nimkar) ही साकारते. नुकताच  माधवी निमकरनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर काही अॅक्शन सीन्स शूट करताना दिसत आहेत.  माधवीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 


Aishwarya Narkar: "बुद्धी गंजेल असे विचार करून..."; ट्रोलरला ऐश्वर्या नारकरनं दिलं सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar:  अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)  आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे  सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात. त्यांच्या डन्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या डान्सच्या व्हिडीओला कमेंट्स करुन काही लोक त्यांचे कौतुक करतात. तर काही लोक त्यांना ट्रोल देखील करतात. नुकताच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी "रूप तेरा मस्ताना" या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ऐश्वर्या आणि अविनाश यांना ट्रोल केलं. या ट्रोलरला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट

Amitabh Bachchan: आज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा वाढदिवस आहे. बिग बी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्कि 2898 AD (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या टीमनं चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. कल्कि 2898 AD या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकचा फोटो चित्रपटाच्या टीमनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



Aamir Khan: आमिर खाननं लेकीच्या लग्नाची तारीख केली जाहीर; होणाऱ्या जावयाचं केलं कौतुक, म्हणाला...

Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) आयरा लग्न करणार आहे. नुकतीच आमिरनं आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. एका मुलाखतीमध्ये आमिरनं आयराच्या विवाह सोहळ्याची माहिती दिली तसेच त्यानं नुपूरचं कौतुक देखील केलं. 



Aamir Khan Announces His Next Film: आमिर खाननं केली नव्या चित्रपटाची घोषणा; 'तारे जमीन पर'सोबत आहे खास कनेक्शन

Aamir Khan Announces His Next Film: बॉलिवूडचा  'मिस्टर परफेक्शनिस्ट'  अशी ओळख असणारा आमिर खान (Aamir Khan) हा विविध विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करतो. त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकतीच आमिरनं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par)  या चित्रपटासोबत खास कनेक्शन आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anurag Thakur : स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्यांवर आधारित 'भारत हैं हम'; अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च

Anurag Thakur Launches Bharat Hain Hum Series : केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या हस्ते दिल्लीत 'भारत हैं हम' (Bharat Hain Hum) या अॅनिमेटेड सीरिजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमानिमित्त प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स आणि दूरदर्शनवर या मालिकेचं प्रसारन होणार आहे. हिंदी सिनेसृष्टी आणि एकंदरीतच मनोरंजनसृष्टीसाठी ही सीरिज महत्त्वाची असणार आहे.

Kiran Mane: "ॲंग्री यंग मॅन हा मनात, मेंदूत,रक्तात भिनला.."; बिग बींच्या वाढदिवसानिमित्त किरण मानेची खास पोस्ट

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे.  अमिताभ बच्चन यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 


 


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'च्या 'टॉप 5'मध्ये पोहोचला 'आपला माणूस' शिव ठाकरे! म्हणाला,"आता नव्या मंचाची वाट पाहतोय"

Shiv Thakare on Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13' हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दरम्यान 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाने मला अभिनेता म्हणून तयार करण्यात मदत केली, असं 'आपला माणूस' शिव ठाकरे म्हणाला आहे.

Jawan OTT Release : शाहरुखचा 'जवान' लवकरच ओटीटीवर येणार! 200 कोटी रुपयांत विकले गेले राईट्स

Shah Rukh Khan Jawan OTT Release : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धमाका करत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

Tiger 3 New Poster: "टायगर आ रहा है, रेडी हो जाओ!"; Tiger 3 चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, सलमानच्या लूकनं वेधलं लक्ष

Tiger 3 New Poster: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या टायगर-3 (Tiger 3)  या आगामी चित्रपटाच्या माध्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला. तसेच या चित्रपटामधील कतरिना कैफचा लूक देखील रिव्हिल करण्यात आला. आता टायगर-3 या चित्रपटाचं नवं पोस्टर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमधील सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



Amitabh Bachchan Upcoming Movies : 'गणपत' ते 'कल्कि 2898 AD'; अमिताभ बच्चन गाजवणार बॉक्स ऑफिस!

Amitabh Bachchan Upcoming Movies : हम जहाँ खडे हो जाते हैं..लाइन वहींसे शुरू होती है... 'कालिया' सिनेमातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हा डायलॉग त्यांच्या करिअरसाठी अत्यंत योग्य आहे. गेल्या पाच दशकांपासून अमिताभ बच्चन प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. या पाच दशकांमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. एज इज जस्ट अ नंबर हे त्यांनी दाखवून दिलं आहे. 

Animal : 'अ‍ॅनिमल' सिनेमातील 'हुआ मैं' गाणं आऊट; रणबीर-रश्मिकाच्या सिझलिंग केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Ranbir Kapoor Rashmika Mandanna Animal First Song Hua Main Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला असून आता या सिनेमातील पहिलं गाणं 'हुआ मैं' (Hua Main) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

217 Padmini Dham : '217 पद्मिनी धाम'चा थरार रंगभूमीवर; रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित नाटक

217 Padmini Dham New Marathi Drama : गूढकथा आणि रहस्य कथांच्या बाबतीत जेव्हा केव्हा बोललं जात तेव्हा रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) हे नाव हमखास घेतलं जातं. आपल्या लिखाणाने एक रहस्यमयी आणि गूढ जगात या कथा वाचकांना घेऊन जातात. याच कथांच अनेकदा जिवंत कलाकृतीत रूपांतर झालं असून आता रत्नाकर मतकरी यांच्या 'कामगिरी' या कथेवर आधारित '217 पद्मिनी धाम' हे नाटक रंगभूमीवर येत आहे.

Rohit Pawar : टोलवरुन प्रश्न विचारणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे सोशल अकाऊंट्स टार्गेट, ट्रोल गँग वापरुन किती खालची पातळी गाठणार, रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar On Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) टोलवाढीविरोधात ट्वीट केलं त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्रीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ शेअर करत टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित केला. पुढे अभिनेत्रीच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली. त्यानंतर तिने पुन्हा एक खास पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील कुणाकुणाचा आवाज दाबणार असं म्हणत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.

Rohit Pawar : टोलवरुन प्रश्न विचारणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे सोशल अकाऊंट्स टार्गेट, ट्रोल गँग वापरुन किती खालची पातळी गाठणार, रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar On Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) टोलवाढीविरोधात ट्वीट केलं त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्रीने देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करत टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित केला. पुढे अभिनेत्रीच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली. त्यानंतर तिने पुन्हा एक खास पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील कुणाकुणाचा आवाज दाबणार असं म्हणत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.

Hina Khan : महादेव बुक ॲप प्रकरणी हिना खानचा व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्रीची होणार चौकशी

Hina Khan On Mahadev Online Gaming App Case : महादेव ऑनलाईन बुक अॅप (Mahadev Online Gaming App) प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या अॅप प्रकरणी अनेक बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी आता अभिनेत्री हिना खानची (Hina Khan) चौकशी होणार आहे.

Anil Kapoor : अनिल कपूरची नवी भूमिका; 'छावा' सिनेमात दिसणार औरंगजेबाच्या भूमिकेत

Anil Kapoor Play Role Aurangzeb in Chhava : 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सध्या त्यांच्या आगामी 'छावा' (Chhava) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. विकी कौशल (Vicky Kaushal) आणि 'रश्मिका मंदाना' (Rashmika Mandana) या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या सिनेमासाठी अनिल कपूर (Anil Kapoor) यांना विचारणा झाली असून ते औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये सनी देओलची एन्ट्री; हनुमानाच्या भूमिकेत झळकणार तारा सिंह

Sunny Deol Entry in Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या नितेश तिवारीच्या 'रामायण' (Ramayana) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता यशची एन्ट्री होणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता 'गदर 2' (Gadar 2) फेम सनी देओल (Sunny Deol) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 

Mahadev Online Gaming App : महादेव ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप प्रकरणी संजय दत्त, सुनील शेट्टीसह 34 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर!

Mahadev Online Gaming App : महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणी (Mahadev Online Gaming App) प्रकरणी आता एक नवी अपडेट समोर आली आहे. 18 सप्टेंबरला UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन व सक्सेस पार्टी मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. यात संजय दत्त (Sanjay Dutt), सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचाही समावेश आहे.

Amitabh Bachchan Birthday : अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस! मध्यरात्री 'जलसा'बाहेर चाहत्यांची गर्दी; बिग बींनी केला शुभेच्छांचा स्वीकार

Amitabh Bachchan : हिंदी सिनेसृष्टीचा डॉन अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे. अमिताभ यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा (Jalsa) निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला. यावेळी स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले.

Amitabh Bachchan Birthday: आर्थिक अडचणींमुळे मरीन ड्राईव्हच्या बाकावर काढावी लागली रात्र; तरीही मागे हटले नाहीत 'शेहनशाह'; असा सुरु झाला हिट चित्रपटांचा 'सिलसिला'

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय या गोष्टींमुळे अमिताभ बच्चन यांची प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. गेली कित्येक वर्ष बिग बी हे चित्रपट आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण खचून न जाता, त्यांनी त्या अडचणींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Aatmapamphlet Marathi Movie : चित्रपटाचं नाव ते गोष्ट; परेश मोकाशी आणि आशिष बेंडे यांनी सांगितली "आत्मपॅम्फ्लेट" सिनेमाची पडद्या मागची कहाणी!


Aatmapamphlet Marathi Movie :  आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा होता आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे.  आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या नावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी  आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचे नाव, या चित्रपटाची गोष्ट या सर्व गोष्टींबाबत चर्चा केली. 


Katrina Kaif : 'Tiger 3' सिनेमातील कतरिना कैफचा लूक आऊट; हातात बंदूक घेऊन दिसली जोया


Katrina Kaif New Look From Tiger 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी 'टायगर 3' हा सिनेमा सज्ज आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील कतरिना कैफचा (Katrina Kaif) लूक समोर आला आहे.'टायगर 3' या सिनेमातील कतरिना कैफचा नवा लूक समोर आला आहे. नव्या लूकचं पोस्टर अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये कतरिनाचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. कतरिनाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.


Tejaswini Pandit : आमच्या टोलचे पैसे गेले कुठे? प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कारवाई, सोशल अकाऊंट्स टार्गेट!


Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टोल वाढीवरुन (Toll Agigation) मनसे (MNS) आक्रमक झाले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही आवाज उठवला आहे. तेजस्विनीच्या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. आता या ट्वीटनंतर तिचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.