Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो 'इतिहासातील सर्वात बेकार शो', या लेखकांना फटकारलं , अवघ्या 2 भागांनंतर प्रेक्षकांची संख्याही 30 टक्क्याने घसरली
असभ्य विनोदांसाठी आणि धक्काबुक्की करण्याच्या प्रवृत्ती विषयी त्यांना चांगलंच सुनावलंय.कपिल शर्मा शो मध्ये महिलांचा अनादर केला जातो. असंही या लेखकानं म्हणत या शोला वाईट विनोदांचा पुरस्कर्ता म्हटलंय.
Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो एका दशकाहून अधिक काळ टेलिव्हिजनवर वरचढ ठरलाय दिवसभराच्या कटकटी टेन्शन विसरून अनेक जण आवर्जून हा शो पाहायचे . गेल्या काही दिवसांमध्ये या शोमध्ये अनेक बदल करण्यात आले .शोचं नाव द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो असं ठेवत फॉरमॅट ही काहीसा बदलण्यात आला. दरम्यान कपिल शर्मा शो हा भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट शो असल्याचं म्हणत एका लेखकांना कपिल शर्मा शोला चांगलंच फटकारलंय . अनेक बडे कलाकार ही असोला असंस्कृत आणि अश्लील म्हणून हिणवतायेत . दरम्यान आता केवळ दोन एपिसोड नंतर द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोला मोठाच फटका बसलाय . या शोच्या प्रेक्षकांची संख्या लक्षणीय कमी झाली असून अवघ्या दोन भागांनंतर 30 टक्क्यांनी घसरलीये .
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत एफआयआर आणि एबीसीडीया चित्रपटांचा लेखक अमित आर्यन याने कपिल शर्माच्या कार्यक्रमाची एक वादग्रस्त फीत शेअर करत इतिहासातील सर्वात वाईट शो म्हणत त्याला फटकारलंय . या शोला त्याच्या असभ्य विनोदांसाठी आणि धक्काबुक्की करण्याच्या प्रवृत्ती विषयी त्यांना चांगलंच सुनावलंय . डिजिटल कॉमेंट्री ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना असही म्हटलं, कपिल शर्मा शो मध्ये महिलांचा अनादर केला जातो. हे वादग्रस्त वाटू शकते परंतु मला हे सांगण्याचा अधिकार आहे कारण मी कपिल शर्मा की कुशारता आणि कृष्णा अभिषेक यांच्यापेक्षा अधिक अनुभवी आहे.
कपिल शर्मा एकटा शो हेड करण्यास सक्षम नाही
कपिल शर्मा एकटा हा शो पोस्ट करण्यास सक्षम नसल्याचं अमित आर्यन म्हणाला. त्याच्या शो मधील इतर कलाकारांशिवाय तो काहीच नाही. त्याने त्याच्या यशाचा श्रेय या कलाकारांना दिलं पाहिजे. तो पुढे असेही म्हणाला, तुम्ही कपिल शर्मा चा शो काळजीपूर्वक पाहिल्यास तो शो चालवत नाही त्याची इतर पात्रे तो चालवतात हे लक्षात येईल. त्याने नेटफ्लिक्स वर कपिल शर्मा आय एम नॉट डन इट हा शो देखील रिलीज केला होता. हा शो कोणीही पाहिला नाही. त्याला काय म्हणायचे आहे यात कोणालाच रस नव्हता असेही अमित आर्यन म्हणाला.
कपिल शर्मा शो खराब विनोदाला हातभार लावतो
कपिल शर्माच्या कॉमेडी सो मधील संपूर्ण कलाकारांनी खराब विनोदाला हातभार लावला आहे असं एबीसीडी सिनेमाचा लेखक अमित आर्यन म्हणाला. समस्या ही आहे की आजच्या पिढीला चांगल्या कॉमेडीचा सामनाच करावा लागत नाही. त्यामुळेच जेव्हा कोणी लज्जास्पद आणि शरीराला लाजवेल असे बोलते तेव्हा ते हसतात. असेही तो म्हणाला.
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोची प्रेक्षक संख्या घटली
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो नुकताच दुसऱ्या पर्वात पोहोचला आहे. पण दुसऱ्या पर्वाची सुरुवात होताच अवघ्या दोन भागांनंतर या शोची प्रेक्षक संख्या तब्बल 30 टक्क्यांनी घटल्याचं द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातून कळते . पहिल्या सीजनच्या प्रीमियरच्या तुलनेतही दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरला निम्मेच व्ह्यूज मिळाले असून ग्लोबल टॉप टीव्ही शोच्या नॉन इंग्रजी श्रेणीत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर हा शो पोहोचला आहे . याचे कारण प्रत्येक दर्शक प्रत्येक भाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहात नाही असे सांगण्यात आलंय .