Govinda on Misfiring: मिसफायरनंतर गोंविंदानं सांगितला त्यादिवशीचा घटनाक्रम, हात जोडून म्हणाला,कोणत्याही प्रकारे गैरसमज करु नका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी विचारपूस केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो.
Govinda Misfiring: सोमवारी राहत्या घरात मिसफायर केल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या गोविंदाला शुक्रवारी सकाळी डिस्चार्ज मिळाला. यावेळी पहिल्यांदाच त्याने माध्यमांशी संवाद साधला. हा अपघात कसा झाला? त्यावेळी नक्की काय घडले याचा घटनाक्रम सांगत या गोष्टीचा कृपया कोणीही अन्य कशाशी संबंध जोडू नये अशी हात जोडून विनंतीच केली. शुक्रवारी मुंबईतील रुग्णालयातून त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी व्हीलचेअरवर रुग्णालयातून बाहेर आणले.
गोंविंदानं मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे मानले आभार
मी बरा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली. लोकांनी आशीर्वाद दिले. त्या सर्वांचे मी आभार मानतो. या कठीण काळात माझी काळजी घेतल्याबद्दल मी रुग्णलयातील डॉक्टर, परिचारिका, आणि कर्मचारी यांचे आभार मानू इच्छितो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी विचारपूस केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली, त्या सर्वांचे धन्यवाद मानतो. सर्वांच्या कृपेने मी आता सुखरुप आहे. असं गोविंदा म्हणाला.
सुरुवातीला झटका लागल्याचं जाणवलं..
मंगळवारी सकाळी गोंविदाच्या मिसफायरच्या बातमीनं सगळीकडे मोठा गदारोळ झाला होता. याविषयी माहिती देताना गोविंदा म्हणाला, सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की हे घडले आहे. मी कोलकत्ता येथे एका शोसाठी निघालो होतो. सकाळी पावणे पाचची वेळ होती. त्यावेळी बंदूक माझ्या हातून पडली आणि गोळी सूटली. सुरुवातीला झटका लागल्याचं जाणवलं. खाली वाकून पाहिले तर रक्ताच्या धारा निघत होत्या.
हात जोडून म्हणाला यात कुणाला सहभागी करू नये
यानंतर गोविंदानं हात जोडून या प्रकणत इतर कोणाला सहभागी करून नये असं सांगितलं. या अपघाताचा अन्य कशाशी संबंध जोडू नये, यावरही त्यांनी भर दिला. विमानतळावर जाण्यापूर्वी तो आपली बंदूक साफ करत असताना झाला. ही घटना घडली तेव्हा अभिनेता त्याच्या घरी एकटाच होता. हा शॉट अपघाती होता. असंही तो म्हणाला. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीही माध्यमांशी बोलताना डिस्चार्ज मिळत असल्याबाबत आनंद वाटतो, असे सांगितले.
#WATCH | Mumbai: Actor and Shiv Sena leader Govinda says, "I thank everyone for their prayers... I thank CM Shinde, police and the press. I especially thank my fans for praying so much for me. I thank them from the bottom of my heart for their love." https://t.co/O5nWBbUz9G pic.twitter.com/nsmcxMPoCi
— ANI (@ANI) October 4, 2024
3-4 आठवड्यासाठी सांगितलाय आराम
गोविंदावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की अभिनेत्याला धोका नाही आणि त्याला दाखल केल्यानंतर काही तासांत गोविंद बाहेर काढण्यात आला होता. अभिनेत्याने शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस रुग्णालयात घालवले, गोविंदाला आता ३-४ आठवडे आराम करण्यास सांगितले आहे, त्याचे व्यायाम, फिजिओथेरपी सुरू आहे. तो ठीक आहे. आम्ही त्याला डिस्चार्ज देत आहोत. तो घरी आराम करेल." असं डिर्चार्ज करताना डॉक्टरांनी सांगितले आहे.