Arbaj Khan: बाबा सिद्दकींच्या हत्येनंतर भाईजान दु:खी, अजबाज खान झाल्या प्रकारावर म्हणाला , आमचं कुटुंब अस्वस्थ..
बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबात तणाव आहे. अभिनेता अरबाज खान याने याविषयी प्रतिक्रीया दिली आहे.
Arbaj Khan:बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मनोरंजनसृष्टीत सध्या कमालीच्या तणावाचे वातावरण आहे . बाबा सिद्दकी यांच्या जवळचा मित्र म्हणून चर्चेत असणाऱ्या सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे . बिश्नोई गॅंगकडून धमकी व हल्ल्याचे इशारे येत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून यावर्षी एप्रिलमध्येही त्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने सलमान खान आणि त्याचे कुटुंब सध्या खूप कठीण टप्प्यातून जात आहे . दरम्यान या साऱ्या घटनेवर अरबाज खान यानं प्रतिक्रिया दिली आहे .
भाईजान दुःखी ,कुटुंब अस्वस्थ
सलमान खानचा जवळचा मित्र आणि राजकारणी बाबा सिद्ध की यांची हत्या झाल्यापासून भाईजान खूप दुःखी आहे . सध्या संपूर्ण कुटुंब सलमान खानला कसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे यावर बोलताना अरबाज म्हणाला , हे खरे आहे .आम्ही पूर्णपणे ठीक आहोत असे मी म्हणणार नाही . आम्ही बरे होत आहोत . आमचे कुटुंब सध्या खूप अस्वस्थ आहे . कारण सध्या कुटुंबात बरेच काही घडत आहे . अर्थात प्रत्येक जण काळजीत आहे .
सामान्य होण्याचा प्रयत्न करतो आहोत
अरबाज खान म्हणाला, सध्या कुटुंबात बरेच काही घडत आहे. आमचे कुटुंब खूप अस्वस्थ आहे. आम्ही सामान्य होण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरकार आणि पोलिसांसोबत असणारे प्रत्येक जण हे आम्ही सुरक्षित आहोत यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. आम्हाला आता असेच राहायचं आहे.
पोलिसांनी सलमानच्या घराची सुरक्षा का वाढवली आहे?
आपला प्रिय मित्र गमावल्यानंतर सलमान खान पूर्णपणे दुःखी झाला आहे. बिश्नोई टोळीतील असल्याचा दावा करणारे एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करून सलमानला मदत करण्यासाठी बाबा सिद्धकीची हत्या केलाचा दावा केलाय. आणि इतरांनी असे न करण्याचा इशाराही त्यात देण्यात आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवल्याचे समजते.
सलमान खानला वाय प्लस सिक्युरिटी म्हणजेच जवळपास 25 सुरक्षा कर्मचारी सलमान खानच्या सुरक्षेत असतील. ज्यामध्ये सुमारे 2 ते 4 NSG कमांडो आणि पोलिस सुरक्षा कर्मचारी म्हणजेच सुमारे 25 सुरक्षा कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. या सुरक्षा दलाकडे 2 ते 3 वाहने असून त्यात बुलेट प्रूफ वाहनाचाही समावेश आहे.
सरकार वर्षभरात किती कोटी रुपये खर्च करणार?
तज्ज्ञांच्या मते, Y Plus सुरक्षेवर दरमहा सुमारे 12 लाख रुपये खर्च होतो, म्हणजेच वार्षिक खर्च सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत जातो. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही वाय प्लस सिक्युरिटी टीमसोबत उपस्थित असलेल्या लोकांची संख्या सुरक्षेच्या कारणास्तव स्पष्टपणे सांगता येणार नाही.