एक्स्प्लोर

Drisyham 3 Teaser: मोहनलालच्या ‘दृश्यम 3’ टीझरने वाढवली धडधड! जुनं रहस्य उकरलं जाणार? 1 मिनिट 50 सेकंदाचा थरार

सुमारे 1 मिनिट 50 सेकंदांच्या या टीझरमध्ये जॉर्ज कुट्टीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो.

Mohanlal Drishyam 3 Teaser: मोहनलालचा बहुचर्चित ‘दृश्यम 3’ अखेर चर्चेच्या शिखरावर पोहोचला आहे. चित्रपटाचा अधिकृत टीझर काल( 29 एप्रिल) सायंकाळी 5 वाजता रिलीज करण्यात आला असून, रिलीजपूर्वीच चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे.  १३ वर्षांपूर्वी 'दृश्यम'मधून सुरू झालेली एका 'क्लासिक गुन्हेगारा'ची ही कथा, आता या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात अशा वळणावर पोहोचली आहे, जिथे जॉर्ज कुट्टीच्या चेहऱ्यावर दिसत असलेली भीती प्रेक्षकांचं कुतूहल चाळवणारी ठरतेय.

टीझरमध्ये नेमकं काय?

सुमारे 1 मिनिट 50 सेकंदांच्या या टीझरमध्ये जॉर्ज कुट्टीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. चर्चमध्ये प्रार्थना करताना दिसणारा जॉर्ज कुट्टी यावेळी आत्मविश्वासाऐवजी भीतीत असल्याचं जाणवतं. फ्लॅशबॅक दिसतात आणि मोहनलालचे पात्र, जॉर्जकुट्टी, अखेरीस चिंतेने म्हणतो “आता मला भीती वाटतेय… कोण आपल्यावर लक्ष ठेवून आहे माहित नाही” यावरून कथेत आणखी मोठा ट्विस्ट दडलेला असल्याची चाहूल लागते.

 

पोस्टरमधून वाढला सस्पेन्स

टीझरपूर्वी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये जॉर्ज कुट्टी हातात फावडा आणि शेतीची साधनं घेऊन दिसतो. हा त्याच्या ‘सामान्य’ इमेजचा संकेत मानला जातोय. पण चाहत्यांचं म्हणणं वेगळंच आहे…हा चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे, विशेष म्हणजे याच दिवशी अभिनेते मोहनलाल यांचा वाढदिवसही आहे. आधी 2 एप्रिलची तारीख ठरलेली होती, पण नंतर ती पुढे ढकलण्यात आली. या भागातही जुनी स्टारकास्ट कायम आहे. मीना, अन्सिबा हसन, एस्तेर अनिल, आशा शरथ, मुरली गोपी आणि सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

अजय देवगणचा दृश्यम 3 कधी येणार?

मोहनलाल यांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर लगेचच, अजय देवगननेही त्याच्या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची घोषणा केलेली. गेल्या वर्षी, 22  डिसेंबर 2025  रोजी, त्याने 'दृश्यम 3' चा टीझर प्रदर्शित केलेला. 1 मिनिट 13 सेकंदांच्या या टीझरमध्ये अजय देवगनचा एकपात्री संवाद आहे. तो म्हणतो, "जग मला अनेक नावांनी हाक मारतं, पण मला त्याची पर्वा नाही, कारण गेल्या सात वर्षांत जे काही घडलं, जे काही मी केलं, जे काही मी पाहिलं, जे काही मी दाखवलं, त्या सगळ्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे. या जगात प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं, प्रत्येकाचा हक्क वेगळा असतो. माझं सत्य, माझा हक्क फक्त माझं कुटुंब आहे. जोपर्यंत प्रत्येकजण थकून जात नाही, जोपर्यंत प्रत्येकजण पराभूत होत नाही, तोपर्यंत मी इथे एक पहारेकरी, एक रक्षक, एक भिंत म्हणून उभा राहीन, कारण ही कथा अजून संपलेली नाही. अंतिम भाग अजून यायचा आहे." अजय देवगण अभिनीत 'दृश्यम 3' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget