एक्स्प्लोर

Drishyam 3: सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, सोमवारी 'दृश्यम 3'नं किती कोटी कमावले? 100 कोटींचा टप्पा ओलांडणार?

Mohanlals Drishyam 3: 'दृश्यम 3' या सिनेमानं 12 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

Drishyam 3: साऊथ सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) अभिनीत सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3'नं (Drishyam 3) प्रेक्षकांमध्ये भुरळ घातली आहे.  बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जलवा पाहायला मिळत आहे. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. जॉर्जकुट्टीच्या भूमिकेतील  मोहनलाल यांच्या अभिनयाला पुन्हा एकदा प्रचंड प्रशंसा मिळत असून, अनेकजण त्यालाच या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणत आहेत.   आता प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 12व्या दिवशी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

12 व्या दिवशी 'दृश्यम 3' नं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Drishyam 3 Box Office Collection)

'दृश्यम 3' हा चित्रपट 21 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.  पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे.  प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यासाठी  हा चित्रपट यशस्वी ठरत आहे.  या सिनेमाच्या कमाईचा आलेख कायम चढता राहिला आहे.  रिलीजपूर्वी या 'दृश्यम 3'  या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, हा सिनेमा रिलीजनंतरही या सिनेमाची चर्चा होत आहे.

Drishyam 3 या सिनेमानं पहिल्या आठवड्यात किती कोटींचे कलेक्शन केले? (Drishyam 3 box office collection)

पहिल्या आठवड्यात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.   पहिल्या दिवशी या सिनेमानं 15.85 कोटी रुपयांची कमाई करुन शानदार ओपनिंग केली आहे.  पहिल्या आठवड्यात या सिनेमानं 81.95 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  दरम्यान, रिलीजच्या 9 व्या दिवशी या सिनेमानं4.30 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 10व्या दिवशी या सिनेमानं 5.10 कोटींची कमाई केली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Mohanlal (@mohanlal)

दरम्यान, 11व्या दिवशी म्हणजेच रविवारी या सिनेमानं 5.35 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच 12 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमानं 2.20 कोटी कमावले आहेत. यामुळे 'दृश्यम 3'ची 12 दिवसांतील एकूण कमाई आता 98.90 कोटी रुपये झाली आहे. लवकरच हा सिनेमा  100 कोटींचा गल्ला जमवणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 12 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत लक्षणीय घट दिसून आली, तरीही या सिनेमानं 12 दिवसांत 98.90 कोटींची कमाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

स्वामींचा आशीर्वाद... 'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर डंका; सोमवार असूनही जमवला कोट्यवधींचा गल्ला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget