News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

उसळायची प्रेरणा हवी असेल तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा : डॉ. अमोल कोल्हे

आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या विशेष कट्ट्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भरभरुन संवाद साधला. छत्रपती संभाजी साकारतानाच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा भींतीला पाठ लागते आणि उसळायची उर्मी हवी असते, उसळायची प्रेरणा हवी असते तेव्हा तेव्हा आपण स्वत:ला संभाजी महाराजांच्या चरित्राला को-रिलेट करु शकतो, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीराजे या मालिकेद्वारे महाराजांची भूमिका करत लोकांच्या घराघरात आणि मनात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे हे एबीपी माझाचा लोकप्रिय कार्यक्रम 'माझा कट्टा' वर आले होते. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या विशेष कट्ट्याचे आयोजन करण्यात आले.  यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भरभरुन संवाद साधला. छत्रपती संभाजी साकारतानाच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या. आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण एक आदर्श म्हणून काढतो. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज खूप जास्त नशीबवान होते, कारण त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता, असं डॉ. अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. संभाजीराजांची संपूर्ण कारकीर्द ही संकटांची एक मालिका होती. आज जागतिक संकटाला सामोरे जात असताना आपण ज्या धूसर परिस्थितीचा सामना आपण करतोय, तशी परिस्थिती महाराजांसमोर देखील आली होती. काही परिस्थितींमध्ये महाराजांनी जो संयम दाखवला होता तो आपण आज लक्षात घेणे गरजेचे आहे. आज आपल्याला तो संयम राखणे गरजेचे आहे. ऐतिहासिक कलाकृती वारंवार होणं गरजेचं आहे. इतिहासाकडे साक्षेपी दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे.  इतिहासाचा अभिमान जरुर असावा मात्र अभिनिवेश नसावा. कारण इतिहासात अनेक प्रेरणा आहेत. याकडे आपण जर तर्कशुद्ध भावनेनं बघितलं तर या इतिहासाच्या प्रेरणा आपल्याला दीर्घकाळासाठी उपयोगाच्या आहेत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना डावललं जाण्याची भावना होती. तरुणाईचा कल अॅंग्री यन मॅनकडे जास्त असतो. आणि छत्रपती संभाजीराजे हे अॅंग्री यंग मॅन होते. त्यामुळं छत्रपती संभाजीराजे मालिकेला तरुणाईने डोक्यावर घेतले. ही गोष्ट फार महत्वाची होती. डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका हा एक मापदंड आहे, असंही डॉ. कोल्हे यावेळी म्हणाले. मात्र काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकाला जसे हाऊसफुलचे बोर्ड लागलेले असायचे तसे बोर्ड आता लागत नाहीत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर केवळ राजकारण करण्यासाठी करणं चुकीचं आहे. विधायक गोष्टींसाठीच या महापुरुषांच्या  इतिहासाचा वापर व्हावा, असं देखील ते म्हणाले. आज संभाजीराजे असते तर आज दोन महत्वाच्या गोष्टी केल्या असत्या. एक म्हणजे आपले जे वेगवेगळे सेनापती आहेत त्यांच्यात एकवाक्यता असणे आणि दुसरी म्हणजे अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या धोरणात सुस्पष्टता असणं, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
Published at : 14 May 2020 09:25 AM (IST) Tags: chhatrapati sambhaji maharaj dr. amol kolhe

आणखी महत्वाच्या बातम्या

अकोल्यात एमआयएमच्या उमेदवाराचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा,  एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत काढली ईश्वरचिठ्ठी

अकोल्यात एमआयएमच्या उमेदवाराचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा,  एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत काढली ईश्वरचिठ्ठी

नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आपलं हिंदूचं पॅनल बनवू, मुस्लिम उमेदवार आपल्याला नको, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

आपलं हिंदूचं पॅनल बनवू, मुस्लिम उमेदवार आपल्याला नको, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

अर्ज मागे घे, विधानसभा अध्यक्षांचाच दबाव, धमक्या; खासदार अरविंद सावंतांनी सांगितला भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न'

अर्ज मागे घे, विधानसभा अध्यक्षांचाच दबाव, धमक्या; खासदार अरविंद  सावंतांनी सांगितला भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न'

टॉप न्यूज़

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात