एक्स्प्लोर

दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

Director Jabbar Patel : दिग्दर्शक जब्बार पटेल यांना 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

Director Jabbar Patel , कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. राजर्षी शाहू महाराजांच्या 151 व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन 2025 चा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रांत दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्याचे ट्रस्टने निश्चित केले आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.

प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल : डॉ. जब्बार पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूल मध्ये झाले व इथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यांनी सन 1968 साली पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी मिळवली व त्यानंतर 1970 साली मुंबईहून चाईल्ड हेल्थ पदविका (DCH) प्राप्त केली. सन 1971 मध्ये त्यांनी दौंड जि. पुणे येथे आपल्या स्त्रीरोगतज्ञ पत्नीबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.

डॉ. जब्बार पटेल यांचा कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. डॉ. जब्बार पटेल यांनी 'थिएटर अॅकेडमी' नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन केली व या संस्थेने मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावली. सन 1970 मध्ये त्यांनी विजय तेंडूलकर लिखित 'अशी पाखरे येती' या नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. सन 1972 मध्ये त्यांनी 'घाशीराम कोतवाल' हे ऐतिहासिक व राजकीय परिप्रेक्षातील क्रांतीकारी नाटक सादर केले, ज्याला जागतिक स्तरावर प्रचंड प्रसिध्दी आणि मान्यता मिळाली. या नाटकाचे प्रयोग इंग्लड, अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, हंगेरीसह युरोपातील अनेक देशांमध्ये यशस्वी झाले. 1975 मध्ये चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'सामना' या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड यादीमध्ये अंतर्भूत होता. त्यानंतर सन 1978 मध्ये 'तीन पैशाचा तमाशा' हे पु. ल. देशपांडे यांचे नाटकही त्यांनी प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्याच सुमाराला 1978 मध्ये 'जैत रे जैत' हा मंगेशकर कुटुंबियांनी निर्मिती केलेला लोकसंगीतप्रधान चित्रपट दिग्दर्शित केला, 1979 साली दिग्दर्शित केलेला 'सिंहासन' हा राजकीय परिस्थितिवरील उपरोध असलेला चित्रपट खुप गाजला. पुढे त्यांनी स्वतः निर्माती व दिग्दर्शित केलेला 'उंबरठा' या चित्रपटाने त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली ज्यामध्ये स्मिता पाटील आणि गिरीष कर्नाड यांच्या मुख्य भूमिका होत्या. 'एक होता विदुषक' सन 1991 मधील संगीतमय विनोदी चित्रपट आणि 1994 मधील 'मुक्ता' या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.

त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यीक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींवर चित्रपट व माहीतीपट बनविले आहेत. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह नऊ भारतीय भाषांमध्ये संपूर्ण भारत व परदेशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि कला दिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावे 2012 साली निर्मित 'यशवंतराव चव्हाण' हा चित्रपट आणि पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स.मा. जोशी, इत्यादी माहितीपटांचा समावेश आहे. त्यांचा पं. कुमार गंधर्व यांच्यावर आधारित माहितीपट, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. त्यांनी विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या जीवनावर देखील माहितीपट बनवला आहे.

डॉ. जब्बार पटेल यांचा संगीत नाटक अकादमी कडून सन 1978 साली सन्मान झाला. त्यांना भारत सरकारचा 'प‌द्मश्री' पुरस्कार सन 1982 मध्ये मिळाला, पुण्यभूषण पुरस्कार 2002 मध्ये, विष्णुदास भावे पुरस्कार 2014 मध्ये मिळाला. सध्या ते महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चित्रपट बनवत आहेत.

डॉ. जब्बार पटेल यांनी संगीत नाटक अकादमी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली), फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (FTII) या संस्थांच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे कार्यकारी संचालकपद भूषवले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये परिक्षक म्हणून काम पाहिले आहे. नाटक आणि सिनेमा क्षेत्रांत येण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे एम आय टी संस्थेच्या फिल्म आणि थिएटर स्कूलची स्थापना केली आहे. सध्या ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (PIFF) संचालक व अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंबई तसेच लातूर, नागपूरचंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचेही संचालक आहेत. त्यामुळे डॉ. जब्बार पटेल गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता व लेखक म्हणून ओळखले जातात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?

व्हिडीओ

Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Embed widget