एक्स्प्लोर

Dhurandhar 2 Box Office Collection: ‘धुरंधर 2’नं ते करून दाखवलं जे भल्याभल्यांना जमलं नाही; एका महिन्याचा कमाईचा आकडा किती?‘पुष्पा 2’च्या रेकॉर्डला गाठलं

Dhurandhar 2 Box Office Collection: या दमदार  कामगिरीमुळे ‘धुरंधर 2’ आता जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Dhurandhar 2  Box Office Collection: आदित्य धर दिग्दर्शित आणि  रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर  2: द रिवेंज’ (Dhurandhar 2) या चित्रपटाला रिलीज होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. 18 मार्चला पेड प्रीव्ह्यूद्वारे या चित्रपटाने 51.62 कोटी रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. आता 30 दिवसांतच या चित्रपटाने मोठा जागतिक पातळीवर  मैलाचा दगड रचला आहे. (Dhurandhar 2 Box Office Collection)

30 दिवसांत किती कमाई?

धुरंधर 2 चित्रपटाची  पाचव्या आठवड्याची सुरुवात थोडी संथ झाली असली तरी चित्रपटाची एकूण कामगिरी दमदार राहिली आहे. 30 व्या दिवशी ‘धुरंधर 2’ने सुमारे 2.70 कोटी नेट आणि 3.24 कोटी ग्रॉस कमाई केली. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत 1105.82 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केलं आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धुरंधर 2’ने भारतात एकूण 1323.73 कोटींची ग्रॉस कमाई केली असून परदेशात 418 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची जागतिक कमाई 1741.73 कोटी रुपये इतकी झाली आहे. या कामगिरीमुळे हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सर्वात अव्वल ठरला आहे.

‘पुष्पा 2’च्या बरोबरीत कमाई 

या कमाईने ‘धुरंधर 2’ने पुष्पा 2:द रूल' च्या लाइफटाइम कलेक्शनची बरोबरी केली आहे.विशेष म्हणजे, हा टप्पा गाठण्यासाठी ‘धुरंधर 2’ला फक्त 30 दिवस लागले, तर ‘पुष्पा 2’ला हेच कलेक्शन गाठायला तब्बल 64 दिवस लागले होते. या दमदार  कामगिरीमुळे ‘धुरंधर 2’ आता जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

धुरंधर 2 ची आठवड्यानुसार कमाई

पहिला आठवडा: 674.17 कोटी
दुसरा आठवडा: 263.65 कोटी
तिसरा आठवडा: 110.60 कोटी
चौथा आठवडा: 54.70 कोटी

‘बाहुबली 2’ अजूनही नंबर 1

या यादीत पहिल्या क्रमांकावर बाहुबली 2: द कनक्लूजन आहे, ज्याची लाइफटाइम कमाई सुमारे 1788 कोटी रुपये आहे. ‘धुरंधर 2’ने मात्र RRR, कल्की  2898 AD, KGF: Chapter 2 तसेच ‘जवान’, ‘पठान’, ‘स्त्री 2’ आणि ‘एनिमल’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकलं आहे.

धुरंधर 2 चे कथानक ?

19 मार्च रोजी हिंदीसह सर्व दक्षिण भारतीय भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचा पेड प्रीमियर 18 मार्चला झाला होता. पहिल्या भागात रणवीर सिंह एका भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसला होता, जो दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करतो. हा चित्रपट कंधार विमान अपहरण, 2001 संसद हल्ला आणि 26/11 मुंबई हल्ल्यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ‘धुरंधर 2’मध्ये आर. माधवन, संजय दत्त यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Embed widget