एक्स्प्लोर

'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच OTT वर येण्याच्या चर्चा; पण, Netflix पाहता येणार नाही, मग थिएटरनंतर कुठे रिलीज होणार?

Dhurandhar 2 Changes OTT Partner: धुरंधर 2 च्या टीझरमधून ओटीटी प्लॅटफॉर्मची माहिती समोर आली आहे. धुरंधरचा सिक्वेल जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

Dhurandhar 2 OTT Platform Revealed After Teaser Launch: धुरंधर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धुरंधर 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकणार आहे.   धुरंधर हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. प्रेक्षक हमजा अली मजारीच्या भूमिकेत असणाऱ्या रणवीरच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. रिलीजच्या तीन आठवड्यात जगभरात 1000 कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, आता या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा आहे.

धुरंधर 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट नेमका कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? याबाबत  प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या टीझरमध्ये धुरंधर: द रिव्हेंज थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर कुठे स्ट्रीम होईल, याची देखील माहिती दिली आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भाग  नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार नाही. त्याऐवजी सिक्वेलचा प्रीमियर जिओ हॉटस्टारवर होईल. नेटफ्लिक्सने पहिल्या भागाने स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले होते. 30 जानेवारीपासून या चित्रपटाने त्याचा स्ट्रीमिंग प्रवास सुरू केला.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

धुरंधर 2 जिओ हॉटस्टारमध्ये होणार रिलीज

दरम्यान,  धुरंधर 2च्या पहिल्या पोस्टवर आणि टीझरच्या शेवटी क्रेडिट्समध्ये जिओ हॉस्टारचा लोगो दिसत आहे. ज्यामुळे हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. धुरंधर 2 ची  ओटीटी रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.  

धुरंधर 2 पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित

जिओ स्टुडिओज निर्मित, धुरंधर: द रिव्हेंज 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये  पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल.  आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा  स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी  हा चित्रपट निर्मित केला आहे. दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? हे लवकरच कळेल. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला भागवत फार आवडतात' म्हणणारी नटी बाजूला बसली, पाकिस्तानी सैनिकाच्या मुलाबरोबर चहापान; संजय राऊतांचा RSSवर हल्लाबोल

'मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत...', तिहार तुरुंगात सरेंडर केलेला राजपाल यादव भावूक; अभिनेत्याच्या अडचणी संपेचना

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget