एक्स्प्लोर

'मला भागवत फार आवडतात' म्हणणारी नटी बाजूला बसली, पाकिस्तानी सैनिकाच्या मुलाबरोबर चहापान; संजय राऊतांचा RSSवर हल्लाबोल

Sanjay Raut Criticises RSS and Mohan Bhagwat: संजय राऊतांनी संघ आणि मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला.

Sanjay Raut Criticises RSS and Mohan Bhagwat Over Celebrity Presence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली. याचेच औचित्य साधत संघाकडून शनिवारी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवे क्षितिज या विषयावर सरसंघचाक मोहन भागवत यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खास सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आले होते. सेलिब्रिटींमध्ये अभिनेता सलमान खानची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली.  अदनान सामी आणि शिल्पा शेट्टीने देखील सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.  दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आगपाखड आणि मोहन भागवत यांच्यावर टीका केली.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, "कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. काही लोकांना पाहून आम्हाला धक्का बसला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र भक्ती किती ढोंग आणि पाखंड आहे, हे यातून दिसून येतं. आम्ही पाहिलं गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत न्याहारी करत होता. सरसंघचालकांना याबद्दल माहित नसावं, किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी दिग्गजांना आमंत्रणं दिलं त्यांना माहित नसावं की, सरसंघचालकांच्या बाजूला बसलेले व्यक्ती हे देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. अदनान  सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये होते. 1965 च्या भारत पाक युद्धामध्ये अर्शद खानने भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तो अदनान सामी सरसंघचालाकांच्या बाजूला बसलेला होता. तुम्ही कोणत्या इतिहासाचे धडे देताय? कोणती प्रेरणा देताय?",  असं राऊत म्हणाले. 

"एक नटी होती बाजूला, ती म्हणाली आय लव्ह भागवत. मला भागवत फार आवडतात. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे.  तिच्या नवऱ्यावर अडल्ड फिल्म तयार करण्याचा गुन्हा होता.  ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिथे उपस्थित होते.  कदाचित सरसंघचालकांना याबाबत माहित नसेल, की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे. भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी, लुकआउट नोटिस असणारे कलाकार, बँके बुडवणारे लोकांना तु्म्ही बोलवताय.., संघ पापांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे.  आम्हाला संघाविषयी आदर आहे", असंही राऊत म्हणाले.

"जावेद अख्तर यांना आमंत्रण दिल्याचं मला दिसत नाही. ते थोर सामाजिक विचारवंत आहे.  जावेद अख्तर यांचे काका  हे अंदमानमध्ये सावरकरांसोबत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते.  हे बहुतेक त्यांना  माहित नसेल. शाहरूख खानला बोलवलं नाही. शाहरूख खानचे आजोबा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यातील सेनापती होते. त्यांच्या दृष्टीनं हे सगळे राष्ट्रद्रोही असावेत. अदनाम सामी आणि इतर कलाकार हे त्यांच्या दृष्टीनं राष्ट्रभक्त आहेत", असं म्हणत संजय राऊत यांनी संघावर टीकेचे बाण सोडले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Embed widget