धनुष आणि श्रुती हसनच्या अफेअरची अफवा आणि धनुषच्या संसारात वादळ... जाणून घ्या काय आहे तो किस्सा
अभिनेता धनुष (Dhanush) आणि श्रृती हसन (Shruti Hasan) यांच्या अफेअरच्या चर्चा चित्रपट '3' च्या शूटिंग दरम्यान होत्या.
Aishwaryaa Rajinikanth-Dhanush Separated : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांनी 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विभक्त होण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र श्रृती हसन सोबतच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.
अभिनेता धनुष आणि श्रृती हसन यांच्या अफेअरच्या चर्चा चित्रपट '3' च्या शूटिंग दरम्यान होत्या. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रृतीची लहानपणीची मैत्रीण ऐश्वर्याने केले होते. ऐश्वर्याने श्रृतीला आपला चित्रपट '3' साठी कास्ट केले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान धनुष आणि श्रृती ऐकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी धनुष आपल्या पत्नीसोबत पब्लिक इव्हेंटमध्ये देखील जात नसे. मात्र श्रृतीने या अफवांचे खंडण केले होते. या बातम्या खोट्या असून यामध्ये काही तथ्य नाही. धनुष माझा चांगला मित्र असून त्याने कायम माझी मदत केली आहे. त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी विचार करत नाह. तसेच ऐश्वर्याने देखील या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले होते.
ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत. धनुषचा नुकताच 'अतरंगी रे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात धनुषने महत्त्वाच्या भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून ती चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका देखील आहे.
संबधित बातम्या :