'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत...'; प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी पोस्ट, आढेवेढे न घेता थेटच म्हणाली...
Prajakta Mali On Kranti Redkar: अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर हिच्या आगामी 'मैत्रेया' सिनेमाच्या ट्रेलर रिलीजच्या निमित्तानं तिनं क्रांतीचं तोंड भरुन कौतुक केलंय.

Prajakta Mali On Kranti Redkar: मराठी सिनेसृष्टीची (Marathi Film Industry) लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असते. प्राजक्ता तिच्या कामाचे आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते, पण त्यासोबतच ती तिच्या सहकलाकारांच्या कामचं कौतुकही तिच्या सोशल मीडिया हँडलवरुन करत असते. अशातच आता प्राजक्ता माळीनं मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Marathi Actress Kranti Redkar) हिच्यासाठी एक पोस्ट शेअर (Prajakta Mali Post For Kranti Redkar) केली आहे. प्राजक्तानं क्रांतीचं भरभरुन कौतुक केलंय. तसेच, तिच्या आगामी सिनेमाचंही कौतुक केलंय.
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Director Kranti Redkar) हिच्या आगामी 'मैत्रेया' सिनेमाच्या ट्रेलर रिलीजच्या निमित्तानं तिनं क्रांतीचं तोंड भरुन कौतुक केलंय. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत स्वतःचं स्वतंत्र स्था निर्माण करत, घराची आणि दोन चिमुकल्या मुलींची जबाबदारी सांभाळत क्रांतीनं साकारलेल्या या फिल्मचं प्राजक्ता माळीनं मनापासून कौतुक केलंय. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांकडूनही कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
View this post on Instagram
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली? (Prajakta Mali On Kranti Redkar)
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं क्रांती रेडकरसाठी खास पोस्ट केलीय. त्यात तिनं म्हटलंय की, "हे क्रांती ताई, तू मला अनेक प्रकारे प्रेरित आणि प्रोत्साहित केलं आहेस आणि हे त्याचंच हे आणखी एक उदाहरण आहे. तू जे करत आहेस, ते खरोखरंच उत्कृष्ट आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीमध्ये इतक्या खंबीरपणे पाय रोवून उभं राहणं आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करणं, तसेच दोन लहान जुळ्या मुलांचा सांभाळ करणं, ही काही साधी गोष्ट नाही, हे खरोखरंच कौतुकास्पद आहे. माझं संपूर्ण प्रेम आणि पाठिंबा नेहमी तुझ्यासोबत आहे. ट्रेलर खूप आवडला. सिनेमाला यश आणि खूप खूप शुभेच्छा! आणि आपल्यातलं "मैत्रेय" पण असंच बहरत राहो…"
प्राजक्ता माळीनं क्रांती रेडकरसाठी केलेली खास पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर क्रांती रेडकरनंही तिचे आभार मानले आहेत. प्राजक्ता कायमच सपोर्ट करताना दिसते, अशा शब्दांत क्रांती रेडकरनं तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित आणि क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित 'मैत्रेया' सिनेमाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली असून अमन खळतकर हे सहनिर्माते आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















