Delhi High Court Summons Red Chillies Netflix: समीर वानखेडेंनी वाढवल्या शाहरुख खानच्या अडचणी; रेड चिलीज-नेटफ्लिक्सला दिल्ली हायकोर्टाकडून समन्स
Delhi High Court Summons Red Chillies Netflix: समीन वानखेडे यांनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. अंतरिम मदतीच्या अर्जावर पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Delhi High Court Summons Red Chillies Netflix: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी पुन्हा एकदा शाहरुख खानच्या अडचणीत भर घातली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'शी संबंधित मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयानं बुधवारी पुन्हा सुनावणी केली. समीन वानखेडे यांनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. न्यायालयानं या प्रकरणात समन्स जारी केलं आहे.
अंतरिम मदतीच्या अर्जावर पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. समीर वानखेडे यांच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, दाव्यात सुधारणा करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वकिलानं असा युक्तिवाद केला की, दिल्ली न्यायालयाचे या प्रकरणावर अधिकार क्षेत्र आहे. समीर वानखेडे म्हणाले की, "माझ्या आणि माझ्या पत्नीविरुद्ध काही विशिष्ट URL वर ट्रोलिंग केलं जातंय. या पोस्ट या प्रकरणाशी संबंधित आहेत..."
दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेला याचिकेत सुधारणा करण्याचा सल्ला
न्यायालयानं म्हटलं आहे की, "अशा प्रकरणांचा व्यापक परिणाम होतो, फक्त स्थगिती देता येत नाही..." तुमची तक्रार समजण्यासारखी आहे, पण आपण प्रक्रिया पाळली पाहिजे..." मागील सुनावणीत, न्यायालयानं समीर वानखेडे यांना त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्यास सांगितलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयानं 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'वरील वानखेडे यांच्या याचिकेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
उच्च न्यायालयानं वानखेडेंची 'पासओव्हर'ची मागणी केलेली मान्य
समीर वानखेडे यांच्या वकिलानं उच्च न्यायालयात 'पासओव्हर' मागितला होता. खटला अंतिम झाल्यानंतर सुनावणीची विनंती करण्यासाठी 'पासओव्हर' मागितला जातो. वानखेडे यांच्या वकिलानं खटल्यात सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला होता. दिल्ली उच्च न्यायालयानं समीर वानखेडे यांच्या वकिलाची विनंती मान्य केली आणि म्हटलं की, "तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता..."
दरम्यान, हा संपूर्ण मुद्दा 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजशी संबंधित आहे, ज्यामध्ये समीर वानखेडे यांनी आर्यन खानविरुद्ध हिंसाचार, गैरवर्तन आणि त्याचं नकारात्मक चित्रण केल्याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. त्यांचा दावा आहे की, रेड चिलीजच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजनं ड्रग्ज विरोधी एजन्सी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची प्रतिमा खराब केली आहे आणि जनतेचा विश्वासघात केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























