Deepika Padukone Net Worth : दीपिकाची एका महिन्याची कमाई माहितीये? जाणून घ्या तिच्या संपत्तीबाबत
Deepika Padukone : दीपिकाची एकूण संपत्ती माहितीये?

Deepika Padukone Individual Net Worth : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. 'बाजीराव मस्तानी' (Bajirao Mastani) असो वा 'पद्मावत' (Padmaavat) दीपिकाच्या प्रत्येक चित्रपटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. अनेकांना असा प्रश्न पडत असेल की, एका महिन्यात दीपिका किती पैसे कमावते? जाणून घेऊयात दीपिकाच्या एकूण संपत्तीबाबत...
दीपिका एका महिन्यात जवळपास दोन कोटी रूपये कमावते. वेगवेगळ्या जहिरातींमध्ये तसेच चित्रपटांमध्ये दीपिका काम करते. वर्षभरात दीपिका जवळपास 24 कोटी रूपये कामावते. रिपोर्टनुसार, 2021 या वर्षात दीपिकाची एकूण संपत्ती ही 225 कोटी रूपये होती. गेल्या तीन वर्षात दीपिकाच्या संपत्तीमध्ये बरीच वाढ झाली आहे. 2018 मध्ये दीपिकाची एकूण संपत्ती ही 124 कोटी होती.
एवढचं नाही तर दीपिकाकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्याकडे ऑडी ए8 ही आलिशान गाडी आहे. या गाडीची किंमत 1.2 कोटी रूपये आहे. तसेच तिच्याकडे रेंज रॉव्हर आणि मर्सडीज बेंज या गाड्या देखील आहेत.
View this post on Instagram
दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
