एक्स्प्लोर

De Dhakka 2 : ‘लंडनच्या राणीच्या घरी, जाधवांची स्वारी!’, ‘दे धक्का 2’चा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

De Dhakka 2 : आज (16 जुलै) ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुम्ही पाहिलात का?

De Dhakka 2 : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा भन्नाट टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा जाधवांची स्वारी थेट लंडनमध्ये दाखल होणार आहे. ‘दे धक्का 2’ या चित्रपटासाठी चाहते फारच आतूर झाले आहेत. ‘दे धक्का 2’ हा ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपट ज्याप्रमाणे धम्माल आणि तितकाच काळजाला हात घालणारा होता, त्याप्रमाणे ‘दे धक्का 2’ चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. ‘दे धक्का 2’ चित्रपट 05 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘दे धक्का 2’ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टीझर पाहून हा चित्रपट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणारा ठरेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘दे धक्का 2’ चित्रपटात सर्वाचा मॉर्डन अवतार पाहायला मिळणार आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव या हास्यवीरांची जोरी हसवून हसवून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणेल एवढं नक्की. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्कंठा लागली आहे.

पुन्हा एकदा दिसणार कलाकारांची धमाल!

‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.

‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते.

यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!

यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.

 

महत्त्वाच्या बातम्या

KBC Bhushan Thakre: वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?
वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?
Kavya maran and Anirudh Ravichandran Reception: काव्या मारन अन् अनिरुद्धच्या रिसेप्शनचा शाही थाट; कर्मचाऱ्यांना खास आमंत्रण, पत्रिकसोबत दिली सोन्याची अंगठी
काव्या मारन अन् अनिरुद्धच्या रिसेप्शनचा शाही थाट; कर्मचाऱ्यांना खास आमंत्रण, पत्रिकसोबत दिली सोन्याची अंगठी
Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Alka Kubal Daughter Engagement: अल्का कुबल यांच्या घरात लगीनघाई; धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार, अभिनेत्रीची मुलगी करते काय? PHOTOs
अल्का कुबल यांच्या घरात लगीनघाई; धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार, अभिनेत्रीची मुलगी करते काय? PHOTOs

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
Embed widget