एक्स्प्लोर

Aapdi Thaapdi : 'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकरची चित्रपटात एन्ट्री, ‘आपडी थापडी’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

Aapdi Thaapdi : ‘पैचान कौन?’ या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर (Navin Prabhakar) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Aapdi Thaapdi : ‘पैचान कौन?’ या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर (Navin Prabhakar) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आगामी ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) या मराठी चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत

‘आपडी-थापडी’ या चित्रपटात नवीन प्रभाकर ‘युवराज भोसले’ या भूमिकेत दिसणार आहे. नवीनची ही नवी भूमिका कशी आहे, चित्रपट कसा आहे अशा प्रश्नांची उत्तरं आता चित्रपटगृहातच मिळतील. चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियातून जोरदार दाद मिळाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष चित्रपट पाहण्यासाठी 5 ऑक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navin Prabhakar (@navinprabhakarofficial)

कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटीलची गोष्ट

अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं. त्यामुळे टीझर पाहून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. 'आपडी-थापडी' ही एक मनोरंजक कथा सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.

प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. नवीन प्रभाकरलह श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक,  खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर आऊट झाल्याने प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

श्रेयस तळपदेने मराठी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून कारकिर्द सुरू केली होती. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. 'बाजी' आणि 'पोस्टर बॉईज' या चित्रपटांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा रुपेरी पड्यावर झळकणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्याने ‘आपडी-थापडी’ नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची अर्थात चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget