एक्स्प्लोर

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: अद्याप थेट पंतप्रधान मोदींच्या भेट घेण्यामागचा त्यांचा पूर्ण अजेंडा समोर आला नाही. पण, असं म्हटलं जातं की, त्यांनी पंतप्रधानांव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या राजकारण्यांची भेट घेतली. 

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: तामिळनाडूचे (Tamil Nadu) नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय (Chief Minister Joseph Vijay) यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. दोघांची भेट दिल्लीत झाली. या भेटीवेळी थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी पंतप्रधान मोदींसमोर (PM Modi) तामिळनाडूसाठी काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा केली, या मागण्या बऱ्याच काळापासून केंद्र सरकारकडून रखडलेल्या आहेत. मुख्यमंत्री थलपती विजय तामिळनाडूच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे मु्द्दे आणि मागण्या घेऊन पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले. अद्याप थेट पंतप्रधान मोदींच्या भेट घेण्यामागचा त्यांचा पूर्ण अजेंडा समोर आला नाही. पण, असं म्हटलं जातं की, त्यांनी पंतप्रधानांव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या राजकारण्यांची भेट घेतली. 

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री विजय यांची अत्यंत आपुलकीनं भेट (CM Thalapathy Vijay Meet PM Modi)

या दोन दिग्गजांच्या भेटीचे जे फोटो समोर आले आहेत, त्यावरून सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. 'थलपती' विजय हे पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यावेळी त्यांनी एक साधा काळ्या रंगाचा ब्लेझर, पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केलेली. त्यांनी पंतप्रधानांना फुलांचा सुंदर गुच्छ दिला. पंतप्रधान मोदींनीही, नेहमीच्या आपल्या स्वभावाप्रमाणेच, विजय यांचे हसतमुख चेहऱ्यानं स्वागत केलं. प्रसिद्ध झालेले हे फोटो स्पष्टपणे दर्शवतात की, या दोघांमधील ही भेट अत्यंत आपुलकीपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि थलपती विजय यांची जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमधील ही भेट साधारणपणे 25 मिनिटं चालली, अशी माहिती मिळतेय. ही भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे, कारण थलपती विजय हे सध्या काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहेत. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये या संदर्भात आणखी एका गोष्टीचीही चर्चा सुरू आहे, ती म्हणजे, राज्यात भाजपची सहयोगी असलेल्या 'एआयएडीएमके' (AIADMK) पक्षाचे काही आमदार फुटून 'टीव्हीके' (TVK) पक्षात सामील होण्याची शक्यता.

तामिळनाडू हाऊसमध्ये पोहोचले विजय 

दिल्लीत दाखल होताच, थलपती विजय सर्वात आधी मध्य दिल्लीतील 'तामिळनाडू हाऊस'कडे रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांची भेट दुपारी 4:30 वाजता नियोजित होती. संध्याकाळी, पंतप्रधानांना भेटण्यासाठी विजय 'सेवा तीर्थ' इथे पोहोचले. या दोघांमधील ही भेट साधारणपणे 25 मिनिटं चालली. या भेटीदरम्यान विजय आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या संभाषणाबाबतचे तपशील अद्याप प्रतीक्षेत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याशी कोणत्या विषयांवर चर्चा झाली?

विजय यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी तामिळनाडूशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तामिळनाडूतील शासकीय कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' ऐवजी राज्याचे गीत असलेल्या 'तामिळ थाई'चे गायन सर्वात आधी करण्याची परवानगी त्यांनी मागितली. विजय यांनी नमूद केलं की, 'अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' (AMCA) आणि 'सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टिम्स' (CABS) या प्रकल्पांबाबत सध्या DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) इथे अभ्यास सुरू आहे. त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, CABS ची ही सुविधा तामिळनाडूमध्येच स्थापन करण्यात यावी. विजय यांनी 'मेकेदातू'चा मुद्दाही उपस्थित केला, जो कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेला एक वाद आहे. याव्यतिरिक्त, श्रीलंकेच्या नौदलाकडून तामिळनाडूतील मच्छिमारांवर होणारे हल्ले आणि त्यानंतर त्यांना केली जाणारी अटक यांबद्दल विजय यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी याकडे लक्ष वेधलं की, त्यांच्या राज्यातील 58 मच्छिमार सध्या श्रीलंकेच्या तुरुंगांमध्ये अटकेत आहेत आणि 288 मासेमारी बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीलंकेत अटकेत असलेल्या या मच्छिमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी विजय यांनी केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kamal Haasan Meets Tamil Nadu CM Thalapathy Vijay: मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; समोर ठेवल्या 6 महत्त्वाच्या मागण्या

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget