(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vikram : 'त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला नाही, या अफवा ऐकून दु:ख झालं'; अभिनेता विक्रमच्या मुलानं दिली माहिती
विक्रमचा मुलगा ध्रुवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विक्रमच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
Vikram : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चियान विक्रमला (Chiyaan vikram) तब्येत बिघडल्यामुळे चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखत असल्यानं विक्रमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आहे, अशी माहिती सोशल मीडियावर त्याचे चाहते देत होते पण आता विक्रमचा मुलगा ध्रुवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विक्रमच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
विक्रमचा मुलगा ध्रुवनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'प्रिय फॅन्स आणि शुभचिंतक, माझ्या वडिलांना छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला नाही. ही अफवा ऐकून वाईट वाटलं. आमच्या कुटुंबाला आणि त्यांना प्रयव्हसी देण्याची मी सर्वांना विनंती करतो. आपले चियान हे आता ठिक आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. '
ध्रुवची पोस्ट
विक्रमच्या मॅनेजरनं म्हणजेच सूर्यनारायण एम यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विक्रमच्या प्रकृतीची माहिती दिली.
Dear fans and wellwishers,
— Suryanarayanan M (@sooriaruna) July 8, 2022
Chiyaan Vikram had mild chest discomfort and is being treated for the same. He DID NOT have a heart attack as reports falsely claim. We are pained to hear rumours to this effect.
That being said, we request you to give him and the family the.... 1/2
विक्रमचे आगमी चित्रपट
लवकरच चियान विक्रम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, आदित्य करिकलन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या एका तामिळ कादंबरीवर आधारित आहे. 1995 साली कल्कि यांनी ही कादंबरी लिहिली आहे. कोबरा हा देखील विक्रमचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाध्ये श्रीनिधी शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
Vikram Hospitalized : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली; चैन्नईतील रुग्णालयात दाखल