एक्स्प्लोर

Chinmay Mandlekar : काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत

Chinmay Mandlekar Jehangir : अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. आता या प्रकरणावर कवयित्री प्रज्ञा पवार यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

Chinmay Mandlekar  Jehangir : अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय आणि मुलाचे नाव जहांगीर का ठेवले असा प्रश्न काही ट्रोलर्सने केला. सतत होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मय मांडलेकरने आपण यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नसल्याचे जाहीर केले. हा सगळा गदारोळ सुरू असताना दुसरीकडे कवयित्री प्रज्ञा दया पवार (Pradnya Daya Pawar) यांची पोस्ट चर्चेत आली आहे. 

चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो सध्या बराच ट्रोल होत आहे. सध्या चिन्मयचा मुलगा जहांगीर हा 11 वर्षांचा आहे. नावावरून ट्रोलिंग होत असताना चिन्मयच्या बायकोने म्हणजेच नेहा जोशी मांडलेकरने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. चिन्मयला काहींना पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला होता. या सगळ्या प्रकरणावर चिन्मयच्या बाजूने मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आवाज उठवला. 

ट्रोलिंगच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेकांनी आपली मते मांडली आहेत. मराठीतील आघाडीच्या कवयित्री प्रज्ञा पवार यांनी सोशल मीडियावर जहांगीरच्या निमित्ताने पोस्ट लिहिली आहे. भूमिका वठवण्याआधी भूमिका घ्यावी लागते. ती संविधानवादी आहे की संविधानाला नेस्तनाबूत करणारी आहे? असा प्रश्न स्वत: ला विचारणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रज्ञा पवार यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

प्रज्ञा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  मुळात फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही. त्या भूमिकांच्या संहितांचं सांस्कृतिक राजकारण बेदखल करून त्यांचा अजेंडा पुढे नेला तर गत अशी काहीच्या बाही होऊन बसते.
भूमिका वठवण्याआधी भूमिका घ्यावी लागते. ती संविधानवादी आहे की संविधानाला नेस्तनाबूत करणारी आहे? देशाची गंगा-जमनी तहजीब, बहुलतावादी संस्कृती उंचावणारी आहे, की ती नष्ट करुन अल्पसंख्यांकादि अन्यांप्रती तिरस्कार आणि घृणा निर्माण करणारी आहे याचा निर्णय कलावंत म्हणून कधीतरी घ्यावाच लागतो.
उगीच नाही; 'पार्टनर, तेरी पाॅलिटिक्स क्या है' हा प्रश्न विचारला होता गजानन माधव मुक्तिबोधांनी..
बाकी पूर्ण सहानुभूती आहेच!
जे घडतंय ते अतिशय विदारक आहे.
अखलाकला ठेचून मारलं केवळ  फ्रीजमध्ये बीफ असावं, या संशयामुळे..
मोहसीनला पुण्यात हकनाक संपवलं..
ही अशी कैक उदाहरणं. 
त्यावेळीही जाहीर बोललं गेलं असतं तर बरं झालं असतं. काळ माफ करत नसतो!!
...जहांगीरच्या कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत त्यातून तो बरंच काही शिकेल. कदाचित तो अधिक व्यापक होईल. कदाचित अधिक सहिष्णु.
तसं त्यानं व्हावं हीच सदिच्छा!!

 

ट्रोलर्सना राक्षसी बळ देणाऱ्यांना दणका देणे आवश्यक

दरम्यान, अभिनेता किरण माने यानेदेखील या प्रकरणावर भाष्य केले होते. किरण मानेने म्हटले की, 'धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलींग हे फोफावणार्‍या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्‍या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, 'त्याने मुलाचे नांव २०१३ साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होते आहे. याला म्हणतात 'संविधान धोक्यात येणं'. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नांव ठेवायचं 'स्वातंत्र्य' ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून 'समता' नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मुल्यं नसतील तर 'बंधुता' निर्माण कशी होणार?  बास, एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलींग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या'. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: सैराट फेम अरबाज शेखने रडतरडत सगळं सांगितलं, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने लगेच सोलापूरच्या हॉस्पिटलवर धाड टाकली अन्...
सैराट फेम अरबाज शेखने रडतरडत सगळं सांगितलं, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने लगेच सोलापूरच्या हॉस्पिटलवर धाड टाकली अन्...
Welcome To The Jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
Bigg Boss Marathi 7: 'बिगबॉस मराठी 7' च्या कास्टिगसंदर्भात मेकर्सकडून मोठी अपडेट; सावधानतेचा इशारा देत केली पोस्ट
'बिगबॉस मराठी 7' च्या कास्टिगसंदर्भात मेकर्सकडून मोठी अपडेट; सावधानतेचा इशारा देत केली पोस्ट
Actor Rajesh Sharma Hospitalised: प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Embed widget