Chhaava OTT Release: विक्की कौशलचा 'छावा' ओटीटीवर कधी येणार? कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
Chhaava OTT Release Date and Time: विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत, आता प्रेक्षकही त्याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'छावा' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

Chhaava OTT Release Date and Time: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) सध्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. 'छावा' 2025 मधील सर्वात बहुचर्चित चित्रपट ठरला आहे. 'छावा'नं रिलीज होताच छप्पडफाड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. ज्याचे फायदे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिसून आले आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये धमाकेदार ओपनिंग करणारा आणि विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. थिएटरनंतर, चाहते या हिस्टॉरिकल पीरियड ड्रामा (Historical Period Drama) चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत.
'छावा' चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, त्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे. अशातच अनेकजण 'छावा' ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, 'छावा' ओटीटीवर कधी रिलीज होणार?
छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर मांडणारा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण, यासाठी प्रेक्षकांना काहीशी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तर 45-60 दिवसांनी तो ओटीटीवर येतो. अशा परिस्थितीत, 'छावा'च्या ओटीटी रिलीजसाठी अजून काहीशी वाट पाहावी लागणार आहे.
View this post on Instagram
ओटीटी प्लेच्या अहवालानुसार, निर्मात्यांनी 'छावा'चे डिजिटल हक्क नेटफ्लिक्सला (Netflix) विकले आहेत. याचा अर्थ थिएटरनंतर, 'छावा' लवकरच OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. यापूर्वी 'पुष्पा 2' 56 दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. तर, श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' 46 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला होता. अशा परिस्थितीत, निर्माते 'छावा' किती दिवसांत ओटीटीवर प्रदर्शित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'छावा'ची 2 दिवसांत इतकी कमाई
दरम्यान, जर आपण विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललो, तर या पीरियड ड्रामा चित्रपटानं दोन दिवसांत चांगलं कलेक्शन केलं आहे. सॅकॅनिल्कच्या मते, चित्रपटानं पहिल्या दिवशी 31 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शनिवारी चित्रपटानं 36.5 कोटी रुपये कमावले, त्यानंतर भारतीय बॉक्स ऑफिसवर याचं एकूण कलेक्शन 67.5 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
दरम्यान, 'छावा' चित्रपटाद्वारे विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली. तसेच, चित्रपटात अक्षय खन्ना देखील आहे. अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























