Cannes Film Festival 2022 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या आधी नवाजुद्दीननं आठ वेळा कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली आहे. मंगळवारी (17 मे) त्यानं रेड कार्पेटवर वॉक देखील केला. त्याच्यासाठी यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल खास आहे कारण 19 मे रोजी त्याचा वाढदिवस देखील आहे. 


कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीननं सांगितलं, 'भारताचं प्रतिनिधित्व करणं ही खास गोष्ट आहे. मी माझे पाच-सहा वाढदिवस हे कान्समध्येच साजरे केले. कारण हे फिल्म फेस्टिव्हल दरवर्षी जवळपास एकाच वेळी आयोजित केले जातात. मी असा व्यक्ती नाहीये जो अशा प्रकारे वाढदिवस साजरा करेल. मी सामान्य व्यक्ती आहे. ' 


पुढे नवाजुद्दीननं सांगितलं, 'कान्स फिल्म फेस्टिवल हा चित्रपटांसाठी मक्का आहे. इथे सर्व लोक फक्त चांगल्या चित्रपटाबद्दल बोलतात. इथे कोणीही बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत कोणीही बोलत नाही. सध्या अनेक लोक बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकून सिनेमा पाहतात. '


ऐश्वर्या राय,दीपिका पदुकोण, नयनतारा ,पूजा हेगडे,तमन्ना भाटिया,आदिती राव हैदरी,हिना खान ,नवाजुद्दीन सिद्दीकी,आर माधवन  हे बॉलिवूडमधील कालाकार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. दीपिका ही यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर असणार आहे.


ईवा लोंगोरिया, ज्युलियन मूर, बेरेनिस बेजो आणि "नो टाइम टू डाय" मधील अभिनेत्री लशाना लिंचसह अनेक कलकार मंगळवारी  75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते.  यंदाचा कान्स महोत्सव भारतासाठी खूप खास असणार आहे. कारण यंदाच्या कान्स महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 


कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75व्या पर्वाला मंगळवारी (17 मे) सुरुवात झाली. हा सोहळा 28 मे पर्यंत चालणार आहे.  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी  व्हिडीओ कॉलद्वारे एक खास मेसेज दिला.  


हेही वाचा :