Cannes Film Festival 2022 : यावेळी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’मध्ये (Cannes Film Festival 2022) अनेक बॉलिवूड स्टार्स हजेरी लावणार आहेत. ऐश्वर्या राय बच्चनसह (Aishwarya Rai-Bachchan), कान्समध्ये सहभागी झालेल्या स्टार्समध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone), हिना खान (Hina Khan), पूजा हेगडे (Pooja Hegde), अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि नयनतारा (Nayanthara) यांचा समावेश आहे. दीपिका आधीच कान्समध्ये पोहोचली असताना, ऐश्वर्या देखील अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत या चित्रपट महोत्सवासाठी रवाना झाली.


बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्यासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय देखील ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाली आहे.


ऐश्वर्याचा एअरपोर्ट लूक व्हायरल


मुंबई विमानतळावरून व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये लोकांना ऐश्वर्याचा एअरपोर्ट लूक खूपच क्यूट दिसत होता. यावेळी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केलेला दिसत होता. ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये दिसली. अभिषेक देखील कपाळावर तिला लावून निळ्या रंगाची हुडी आणि डेनिम पॅन्ट परिधान केलेल्या लूकमध्ये दिसला.


आराध्याने पापाराझींसमोर फोटो पोज दिल्या. तिचा हा बेफिकीर अंदाज पाहून ऐश्वर्या राय देखील खूप खूश दिसली. फोटो क्लिक करण्यात आराध्या इतकी मग्न झाली की, आई ऐश्वर्यालाच तिला भानावर आणावे लागले. नंतर ऐश्वर्या तिला विमानतळाच्या गेटकडे घेऊन जाताना दिसली.



चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव


कान्समध्ये जाण्यापूर्वी ऐश्वर्याने तिचा पती अभिषेक आणि मुलगी आराध्या याच्यासोबत मुंबई विमानतळावर चाहत्यांना फोटो क्लिक करू दिले. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून अंदाज लावता येतो की, ती कान्समध्ये जाण्यासाठी किती उत्सुक आहे. ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकला एकत्र पाहून या जोडप्याचे चाहते पुन्हा खूश झाले. चाहते आपापल्या सोशल अकाऊंटवर दोघांचा फोटो शेअर करून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.  


ऐश्वर्या आणि दीपिका व्यतिरिक्त टीव्ही अभिनेत्री हिना खान देखील रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री अदिती राव हैदरी, पूजा हेगडे आणि साऊथ अभिनेत्री नयनतारा देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा :