Rang Majha Vegla : स्टार प्रवाहाच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेने सध्या मनोरंजक वळण घेतलं आहे. या मालिकेत सध्या बरेच ट्वीस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. चिमुकल्या दीपिका आणि कार्तिक सध्या त्यांच्या आई-वडीलांच्या शोधात आहेत. एकीकडे आई आहे, तर दुसरीकडे तिचे बाबा.. आता दोघींना मिळून आपलं चौकोनी कुटुंब पूर्ण करायचं आहे. यामुळेच त्या त्या दोघी आपल्या आई आणि वडीलांचं एकमेकांशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत.


एकीकडे कार्तिकी तिची आई दीपाजवळ डॉक्टर फ्रेंड अर्थात कार्तिकशी दुसरं लग्न कर म्हणून मागे लागली आहे. तर, दुसरीकडे दीपिका देखील दीपाला भेटल्यावर आपल्या आई जवळ असल्यासारखं वाटतं, म्हणून तुम्ही लग्न करा, असं कार्तिकला सुचवते. मात्र, दीपा आणि कार्तिक या दोघांचाही त्यांना विरोध आहे. दीपिका तात्पुरती शांत राहावी म्हणून त्याने एका भलत्याच बाईचा फोटो तिला दाखवला आहे. तुझी आई तुझ्या लहानपणीच देवाघरी गेली, असे कार्तिकने दीपिकाला सांगितले आहे.


श्वेता उधळून लावणार कार्तिकचा प्लॅन


इथे दीपिका तिची आई म्हणून कार्तिकने दिलेला फोटो सर्वांना दाखवत आहे. नेमकं त्याचवेळी श्वेता तिथे येऊन हा फोटो बघते आणि तिला या फोटोतील बाईबद्दल विचारते. तेव्हा, दीपिका तिला ती फोटोतील बाई आपली आई असून, ती देवाघरी गेल्याचं सांगते. मात्र, श्वेताला दीपिका ही दीपाची मुलगी असल्याचं सत्य माहित असल्याने ती आता कार्तिकचं पितळ उघडं पडण्याचा प्रयत्न करणार आहे.


दीपिकाची खोटी आई घरी येणार!


श्वेता अनायसे या बाईला रस्त्यावर बघते आणि तिला पैसे देऊन दीपिकाची आई असल्याचं नाटक करण्यास सांगते. कार्तिकने दीपिकाला आई म्हणून दिलेल्या फोटोतील बाई आता इनामदारांच्या घरात येणार आहे. तर, आपली आई देवाघरी गेली नसून, ती जिवंत आहे, हे पाहून दीपिकाला खूप आनंद होतो. मात्र, त्या बाईला घरात बघून कार्तिकच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे. तेव्हा आता कार्तिक पुढे काय करणार? या बाईला तो दीपिकाची आई म्हणून घरात राहू देणार का? कार्तिकने आपल्याला खोटं सांगितल्याचं सत्य आता दीपिका समोर येणार का?, हे येणाऱ्या भागात कळणार आहे.  


हेही वाचा :