The Kapil Sharma Show : बॉलिवूड अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या बोलण्याने कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणू शकतो. देशातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. कपिलला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र, यशासोबतच कपिलचे वादांशीही घट्ट नाते आहे. आता कपिल पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. इतकेच नाही तर 'द कपिल शर्मा शो'वर (The Kapil Sharma Show) बहिष्कार घालण्याची मागणी ट्विटरवर सातत्याने होत आहे.


यासोबतच युजर्सही कपिलवर जोरदार टीका करत आहेत. या वादाचे कारण म्हणजे 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Agnihotri) यांनी कपिलवर मोठा आरोप केला होता. ट्रेलर आल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत होता आणि नुकताच तो प्रदर्शित देखील झाला आहे. या चित्रपटात काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.


विवेक अग्रीहोत्री यांचे कपिलवर आरोप


दिग्दर्शक विवेक अग्रीहोत्री यांनी कपिलवर आरोप केला आहे की, त्याने (कपिल) त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला, कारण चित्रपटातील कलाकारांमध्ये कुणीही बडा कलाकार नाही. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले, जेव्हा सोशल मीडियावर एका चाहत्याने विवेक अग्रीहोत्रीला 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करावे, असे सांगितले. या चाहत्याने कपिलला त्याच्या शोमध्ये ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे प्रमोशन करण्याची विनंती केली होती. 


सलमान खानवरही साधला निशाणा


विवेक अग्निहोत्री यांनी या मेसेजवर प्रतिक्रिया देत कपिलवर आरोप केला. त्यांनी उत्तरात लिहिले की, 'या प्रकरणी मी निर्णय घेत नाही. हे कपिल आणि निर्मात्याने ठरवले आहे. आमच्या चित्रपटात कोणतेही मोठे स्टार नाहीत, कदाचित म्हणूनच त्यांनी प्रमोशन नाकारले आहे’, असे ते म्हणले.


कपिलसोबतच विवेक यांनी शोचा निर्माता सलमान खानवरही निशाणा साधला. आता हे प्रकरण आणखी चिघळत आहे. विवेक अग्निहोत्रीच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर कपिल शर्माच्या शोला प्रचंड विरोध होत आहे. कॉमेडियन कपिल शर्माला ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.



पंतप्रधान वेळ देऊ शकतात, तर कपिल का नाही?


'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agarwal), विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. यानंतर या वादाला एक वळणं आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेऊन या चित्रपटाचं कौतुक करू शकतात, तर कपिल शर्माने का नका दिला? असं म्हणत पुन्हा एकदा #BycottKapilSharmaShow नेटकरी ट्रेंड करत आहे. ‘ड काश्मीर फाईल्स’चं प्रमोशन नाकारल्यामुळे प्रेक्षक कपिल शर्मावर संतापले आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha