कुलदीप सिंग पुन्हा रणांगणात, बॉर्डर 2 चं पोस्टर समोर, रिलीजची तारीख ठरली; सनी देओलसोबत कोण कोण झळकणार?
border 2 release date confirmed : कुलदीप सिंग पुन्हा रणांगणात, बॉर्डर 2 चं पोस्टर समोर, रिलीजची तारीख ठरली; सनी देओलसोबत कोण कोण झळकणार?

border 2 release date confirmed : सनी देओलचा बॉर्डर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता अनेक वर्षांनंतर सनी देओलच्या बॉर्डर सिक्वेल म्हणजेच बॉर्डर 2 हा सिनेमा हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओलने चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये अपडेट्सची उत्सुकता होती. आज 15 ऑगस्टच्या खास दिवशी सनी देओल यांनी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. सनीने बॉर्डर 2 या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना देशभक्तीपर सिनेमा पाहायला मिळणार आहे. (border 2 release date)
बॉर्डर 2 सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
बॉर्डर 2 च्या पोस्टरमध्ये सनी देओल सैनिकी पोशाखात सर्वात पुढे उभे राहून शत्रूंशी लढताना दिसत आहे. त्याचा आक्रमक लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे . पहिला पोस्टर शेअर करताना सनी देओल म्हणाला – "हिंदुस्तानसाठी पुन्हा एकदा लढूया. बॉर्डर 2 सिनेमागृहात 22 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे." सनी देओल यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडत आनंद व्यक्त केला. कुणी लिहिलं – "एकदा पुन्हा तयार व्हा" तर कुणी लिहिलं – "हिंदुस्तान जिंदाबाद". (border 2 release date)
22 जानेवारीला होणार रिलीज
सनी देओल यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी रिलीज डेट जाहीर करून चाहत्यांना खुश केलं आहे. हा चित्रपट 22 जानेवारीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि सनी देओल याबाबत वेळोवेळी अपडेट्स देत आहेत. रिलीज डेट जाहीर झाल्यापासूनच चाहत्यांना 22 जानेवारीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. (border 2 release date)
View this post on Instagram
सनी देओलसोबत कोण कोण झळकणार?
बॉर्डर 2 मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मेधा राणा, मोना सिंह आणि सोनम बाजवा महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी वरुण धवनचा मिशा ठेवलेला पहिला लूक समोर आला होता, जो प्रेक्षकांना फार आवडला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























