Yuvraj Singh Shoaib Akhtar : भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
Yuvraj Singh Shoaib Akhtar : दिग्दर्शकाच्या मुलाला मध्यरात्री क्रिकेट खेळावं वाटले तर, भाईच्या एका फोनवर थेट शोएब अख्तर आणि युवराज सिंह मध्यरात्री हजर झाले.
Salman Khan Yuvraj Singh Shoaib Akhtar : बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटपटू यांच्यातील सुमधुर संबंध सगळ्यांनाच माहीत आहे. कधीकाळी बॉलिवूडला अंडरवर्ल्डच्या दहशतीला सामोरे जावे लागले. त्याचे अनेक किस्से अनेकदा चर्चिले जातात. नुकताच एक किस्सा समोर आला आहे. दिग्दर्शकाच्या मुलाला मध्यरात्री क्रिकेट खेळावं वाटले. तर, भाईच्या एका फोनवर थेट शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि युवराज सिंह (Yuvaraj Singh) मध्यरात्रीच हजर झाले. हा भाई म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) होय. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी नुकताच हा किस्सा सांगितला.
सलमान खानच्या जवळचे लोक त्याच्या चांगल्या स्वभावाबद्दल आणि मदतीबद्दल बोलतात. आता त्याच्यासोबत काम केलेल्या अनीस बज्मीनेही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक प्रसंग सांगितला आहे. अनीस त्याला 'दिल खान' मानतो. त्याने सांगितले की, सलमान लोकांसाठी काही ना काही करत राहतो. अनीसने सांगितले की, सलमानने शोएब अख्तर आणि युवराज सिंगला त्याच्या 10 वर्षांच्या मुलाचे मन राखण्यासाठी फोन केला होता.
सलमान खान हिरा आहे...
अनीस बज्मी हा सलमान खानचा चाहता आहे. सिद्धार्थ कननच्या शोमध्ये त्याने सलमानला 'दिल खान' का म्हणतो हे सांगितले. अनीसने सांगितले की, त्याच्याबद्दल काय बोलू? येथे खूप कमी लोक आहेत ज्यांना मी खरोखर चांगल्या व्यक्ती असल्याचे म्हणू शकतो. सलमान त्यापैकीच एक आहे. तो एक हिरा आहे. तो लोकांसाठी छोट्या छोट्या गोष्टी करतो जे मला वाटत नाही की इतर कोणी करत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आम्ही श्रीलंकेत रेडीचे शूटिंग करत होतो. त्यावेळी क्रिकेट स्पर्धा सुरू होती.
मुलाने केला हट्ट...
अनीसने पुढे सांगितले की, माझा मुलगा माझ्यासोबत आला होता. त्यावेळी तो 10 वर्षांचा होता. तो क्रिकेटचा मोठा चाहता आहे. तो झोपताना उशाशी बॅट-बॉल ठेवून झोपायचा. त्याला शोएब अख्तर आणि युवराज सिंह दिसले. मग, त्याने या दोघांसोबत क्रिकेट खेळण्याचा हट्ट धरला. शोएब अख्तरने माझ्यासाठी बॉलिंग करावी असे म्हणू लागला. मी त्याला म्हटले की, तू वेडा आहेस का? जाऊन झोप आता. सलमान खानने ही गोष्ट ऐकली. त्याने माझ्या मुलाला पुन्हा बोलावले आणि विचारले तेव्हा माझ्या मुलाने शोएब अख्तरसोबत खेळायचे असल्याचे सांगितले.
हॉटेलच्या लॉबीमध्ये झाला सामना...
अनीसने सांगितले की, मध्यरात्रीनंतर सलमानने मला फोन केला. मला काही समजेपर्यंत शोएब अख्तर आणि युवराज सिंग काही क्रिकेटपटूंना घेऊन तयांच्या मुलासोबत खेळायला आले. हॉटेलच्या लॉबीत क्रिकेटचा सामना सुरू होता. त्याचा मुलगा फलंदाजी करत होता, शोएब अख्तर गोलंदाजी करत होता आणि सलमान खान स्वतः क्षेत्ररक्षण करत होता. अनीसने पुढे म्हटले की, एका मुलासोबत क्रिकेट खेळण्यासाठी सलमानच्या एका फोनवर आले, त्या सगळ्यांचे सलमानवर किती प्रेम असेल, असेही अनीसने म्हटले.