एक्स्प्लोर
'मी कामवाल्या बाईचा मुलगा...', प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा; स्ट्रगलबाबत सांगताना काय म्हणाला?
Vishal Jethwa Cannes Experience: अभिनेता विशाल जेठवानं नुकतीच कान्स महोत्सवात हजेरी लावली. विशालनं त्याच्या संस्मरणीय अनुभवाबद्दल आणि जीवन संघर्षाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
Vishal Jethwa Cannes Experience
1/6

त्याच्या आईसोबत कान्समध्ये जाणं, हा त्याच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण होता, कारण एक काळ असा होता की, त्याची आई इतरांच्या घरात घरकाम करायची आणि आज तीच आई त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर उभी होती.
2/6

विशाल जेठवानं 2025 च्या कान्स चित्रपट महोत्सवात 'होमबाउंड' चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच रेड कार्पेटवर पाऊल ठेवलं, जो केवळ त्यांच्या कारकिर्दीसाठीच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही अभिमानाचा क्षण होता.
3/6

झूमला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विशालनं सांगितलं की, कान्सला जाण्यापूर्वी तो इतका घाबरलेला की, त्याला जाण्याचा विचारच सोडून द्यायचा होता. इंग्रजी बोलणं आणि तिथल्या हाय-प्रोफाइल गर्दीत तो कम्फर्टेबल नव्हता. तो थोडासा घाबरलेला.
4/6

नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
5/6

'होमबाउंड' चित्रपटात साकारलेली भूमिका त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील संघर्षांशी खोलवर जोडलेली आहे, असं विशाल म्हणाला. त्यानं सांगितलं की, त्यानं त्याच्या भूतकाळातील समस्यांना अभिनयात रूपांतरित करून त्या पात्राशी जोडण्याचा प्रयत्न केला.
6/6

होमबाउंड हा चित्रपट 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला, जिथे प्रेक्षकांनी नऊ मिनिटं टाळ्या वाजवून स्टँडिंग ओवेशन दिलं.
Published at : 05 Jun 2025 06:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























