एक्स्प्लोर

Year Ender 2023: ज्युनियर मेहमूद ते सतीश कौशिक; 2023 मध्ये 'या' कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Year Ender 2023:जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला.

Year Ender 2023:  2023  (Year Ender 2023)  या वर्षाचे अवघे काही दिवस बाकी आहेत. यावर्षी अनेक प्रसिद्ध कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.  कलाकारांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला.  जाणून घेऊया अशा स्टार्सबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला. 

चित्रा नवाथे (Chitra Navathe) 

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचे  11 जानेवारी रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रा नवाथे यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले. त्यांनी 1952 मध्ये रिलीज झालेल्या ‘लाखाची गोष्ट' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. 

सुनील होळकर (Sunil Holkar)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते  सुनील होळकर (Sunil Holkar) यांचे 13 जानेवरी रोजी निधन झाले.वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील होळकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

समीर खाखर (Sameer Khakhar)  

अभिनेते समीर खाखर (Sameer Khakhar) यांचे 15 मार्च रोजी निधन झाले आहे.  समीर यांनी 'नुक्कड' या 80 च्या दशकातील प्रसिद्ध मालिकेमध्ये 'खोपडी' ही भूमिका साकारली.पश्चिम उपनगरातील बोरिवली (Borivali) इथल्या राहत्या घरी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

सतीश कौशिक (Satish Kaushik) 

अभिनेते  सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे  9 मार्च रोजी निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 

भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni)

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी 18 मार्च रोजी सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले होते. 

वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyay)

'साराभाई वर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं (Vaibhavi Upadhyay)   मे महिन्यात  निधन झालं आहे. कार अपघातात वैभवीचं निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी  वैभवीने अखेरचा श्वास घेतला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे.तिच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.

शांता तांबे (Shanta Tambe)

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे 19 जून रोजी निधन झाले. वयाच्या 90  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती.  शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करुन अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.  

जयंत सावरकर (Jayant Sawarkar) 

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे जुलै महिन्यात निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya)

अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जवळपास, 45 वर्ष त्या मनोरंजनक्षेत्रात काम करत होत्या.  

चंद्र मोहन (Chandra Mohan) 

तेलुगू चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे 11 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्र मोहन यांनी 1966 मध्ये 'रंगुला रत्नम' या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 

सीमा देव (Seema Deo)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

रिओ कपाडिया (Rio Kapadia) 

चक दे इंडिया फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे 14 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी  त्यांनी जगाचा निरोप घेतला. दिल चाहता है, चक दे ​​इंडिया, हॅप्पी न्यू इअर, मर्दानी यांसारख्या चित्रपटांमध्ये रिओ कपाडिया यांनी महत्वाची भूमिका साकारली.

अखिल मिश्रा (Akhil Mishra)

अखिल मिश्रा (Akhil Mishra) थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटात लायब्रेरियन दुबी ही भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचे  21 सप्टेंबर रोजी निधन झाले.अखिल मिश्रा यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिनेश फडणीस (Dinesh Phadnis)

सीआयडी (CID)  फेम अभिनेते  दिनेश फडणीस यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दिनेश फडणीस यांनी सीआयडी या मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स ही भूमिका साकारली.

ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) 

अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचे 8 डिसेंबर रोजी  निधन झाले आहे. ज्युनियर महमूद यांनी मुंबईतील खार येथील घरात वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूद यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget