World Music Day 2023: आर डी बर्मन ते अमित त्रिवेदी; 'हे' आहेत भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक
जागतिक संगीत दिनानिमित्त (World Music Day 2023) जाणून घेऊयात भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांबाबत...
World Music Day 2023: भारतीय संगीतानं जगभरात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक, वादक आणि संगीतकार हे त्यांच्या कलेनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. जागतिक संगीत दिनाला (World Music Day 2023) Fete de la Musique असंही म्हटलं जातं. 1982 मध्ये जागतिक संगीत दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घेऊयात भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांबाबत...
आर.डी बर्मन (R D Burman)
भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आर.डी बर्मन (R D Burman) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आर.डी बर्मन हे 'पंचमदा' या नावाने लोकप्रिय आहेत. 'सर जो तेरा चक्रे' (Sar Jo Tera Chakraye), 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' (Mere Sapnon Ki Rani), 'कोरा कागज था ये मन मेरा' या आर.डी बर्मन यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आर.डी बर्मन यांनी जवळपास 331 चित्रपटांना संगीत दिलं. त्यांची एव्हरग्रीन गाणी लहानांपासून मोठ्यापर्यंत, सर्वांनाच आवडतात.
ए. आर. रहमान (A. R. Rahman)
प्रसिद्ध संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान यांनी भारतीय संगीत जगभरात पोहोचवण्यात महत्वाची भूमिका साकारली. ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. रोजा, 'दिल से', 'बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'ताल', 'जींस', 'पुकार', 'फिजा', 'लगान', 'स्वदेस', 'जोधा-अकबर', 'युवराज' आणि 'मोहेंजो दारो' या चित्रपटांना त्यानी दिलेल्या संगीतानं अनेकांचे लक्ष वेधले. 'स्लम डॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी त्यांना गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि ग्रॅमी यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
शंकर-एहसान-लॉय (Shankar–Ehsaan–Loy)
शंकर-एहसान-लॉय या भारतीय संगीत क्षेत्रातील त्रिकुटानं आपल्या संगीतानं प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. गायक शंकर महादेवन, गिटारवादक एहसान नूरानी आणि पियानोवादक लॉय मेंडोन्सा यांनी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. जिंदगी ना मिलेगी दोबारा, कल हो ना हो या हिट चित्रपटामधील गाण्यांचे संगीतकार शंकर-एहसान-लॉय हे आहेत.
अमित त्रिवेदी (Amit Trivedi)
प्रसिद्ध संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक अमित त्रिवेदीनं आपल्या संगीतानं तरुण प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. इशाकजादे, डियर जिंदगी,उडता पंजाब, कला, फितूर या हिट चित्रपटांना अमितनं संगीत दिलं आहे. केदारनाथ चित्रपटामधील नमो नमो जी शंकरा हे गाणं अमितनं गायलं आहे. तसेच नैना दा क्या कसूर या अमितनं गायलेल्या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या